अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील खंडोबा मैदानावर लोककलाकार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आजोन करण्यात आलेले होते. गणेशोत्सावाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केलेली होती. मैदान परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने काही वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
संबंधित ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रेक्षकांमध्ये हुल्लडबाजी आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती. काही ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला, त्यामुळे काही काळ कार्यक्रमाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कार्यक्रमातील झालेली गर्दी आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत गौतमी पाटील यांनी प्रतिक्रियी दिली आहे. माझ्या कार्यक्रमात हुल्लडबाजी होत नाही, तर हा रसिक प्रेक्षकांचे माझ्यावर असलेले प्रेम आहे, असे गौतमी पाटील यांनी म्हटले आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहतात, हीच त्यांच्या प्रेमाची भावना असल्याचे स्पष्ट केले आहे.