Ganesh Naik : नवी मुंबईत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार अप्रत्यक्ष टीका केली आहे. “जनतेला गृहीत धरून कोणी नाटक केल्यास, त्याचा तमाशा कसा दाखवायचा हे गणेश नाईकला चांगलेच ठाऊक आहे,” असा स्पष्ट इशारा नाईक यांनी दिला आहे.
हेही वाचा – Umesh Patil: ‘सुनेत्रा पवार आणि कुटुंबाला मानसिक त्रास…’; उमेश पाटलांच्या आरोपांनी राष्ट्रवादीत खळबळ
माझा व्यक्तीशी वाद नाही, पण जनतेचा अंत पाहू नका
आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना गणेश नाईक यांनी सांगितले की, त्यांचा वैयक्तिक पातळीवर कोणत्याही व्यक्तीशी वाद नाही. मात्र, सत्ता किंवा पदाच्या जोरावर कोणी जनतेला गृहीत धरत असेल आणि जनता सर्व काही सहन करेल असा भ्रमात राहत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी नाटकाचा तमाशा लोकांसमोर आणण्याचे काम आपण करणार असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
यापूर्वी अनेक वेळा गणेश नाईक यांनी एकनाश शिंदेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. नवी मुंबईतील क्लस्टर योजना आणि विकास नियंत्रणाचे नियम (UDCPR) यावरून नेते एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात राजकीय वाद सुरू आहे. गणेश नाईकांनी शिंदेंच्या क्लस्टर योजनेला कडाडून विरोध केला असून, यामुळे शहरावर ताण पडेल असा इशारा त्यांनी दिला आहे.