Ganapati Festival Special Trains : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी 21 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी या विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

Ganapati Festival Special Trains : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी 21 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा

Ganapati Festival Special 21 Trains : कोकणात गणेशोत्सव पारंपारिक आणि भव्य स्वरूपात साजरा केला जातो. या सणासाठी दरवर्षी मुंबई आणि गुजरात परिसरातून लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी कोकणात जातात. यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. या सुमारास प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी आणि गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने 'ट्रेन ऑन डिमांड (TOD) – एक्स्ट्रा रश' योजनेअंतर्गत विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर सप्टेंबर 2026 या कालावधीत एकूण 8 जोड्या (16 गाड्या) आणि 21 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

मुंबई, गुजरात अन् कर्नाटकला जोडणाऱ्या विशेष गाड्यांचे जाळे
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी या विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या गाड्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, विश्वामित्री, उदना, वलसाड आणि बांद्रा टर्मिनस या प्रमुख स्थानकांवरून सुटणार असून, त्या मुंबई, गुजरात, कोकण आणि कर्नाटक या भागांना जोडतील. बहुतांश गाड्या विशेष भाड्याने धावतील, तर बांद्रा टर्मिनस ते रत्नागिरी दरम्यान धावणारी विशेष ट्रेन अनारक्षित (Unreserved) स्वरूपात उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा – MSRTC Employee Rules: ST कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध; गणवेशात व्हिडीओ अथवा रील्स बनवल्यास थेट…

गणेशोत्सव विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक व ट्रेन क्रमांक
पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
09013/09014 – मुंबई सेंट्रल–ठोकूर (साप्ताहिक) – 1 फेरी
09019/09020 – मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड (आठवड्यातून 4 दिवस) – 8 फेऱ्या
09035/09036 – बांद्रा टर्मिनस–रत्नागिरी (साप्ताहिक, अनारक्षित) – 2 फेऱ्या
09114/09113 – वडोदरा–रत्नागिरी (साप्ताहिक) – 1 फेरी
09110/09109 – विश्वामित्री–रत्नागिरी (द्विसाप्ताहिक) – 4 फेऱ्या
09124/09123 – विश्वामित्री–रत्नागिरी (साप्ताहिक) – 2 फेऱ्या
09022/09021 – उदना–रत्नागिरी (साप्ताहिक) – 2 फेऱ्या
09030/09029 – वलसाड–रत्नागिरी (साप्ताहिक) – 1 फेरी

IRCTC आणि आरक्षण केंद्रांवर तिकिटे उपलब्ध
या सर्व विशेष ट्रेनची माहिती रेल्वेच्या NTES आणि ICMS प्रणालीवर उपलब्ध करून दिली जाईल. प्रवाशांना IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच रेल्वे स्थानकांतील आरक्षण केंद्रांवरून आपले तिकीट बुक करता येईल. याशिवाय, स्थानकांवर माहिती फलक, उद्घोषणा यंत्रणा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना वेळोवेळी अपडेट्स दिले जातील. प्रवासाचा खोळंबा टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Raigad: कर्जत-खोपोली महामार्गावर कार-दुचाकीची समोरासमोर धडक; महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number