Air Taxi: ट्रॅफिकचं टेन्शन विसरा! आता आकाशातून उडणार ‘एअर टॅक्सी’; लवकरच सुरू होणार प्रवासी सेवा

लवकरच ही टॅक्सी शहरांमधील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन उडताना दिसेल. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून शहरांमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे.<br/>

Air Taxi: ट्रॅफिकचं टेन्शन विसरा! आता आकाशातून उडणार ‘एअर टॅक्सी’; लवकरच सुरू होणार प्रवासी सेवा

Air Taxi: तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा कंटाळा आला असेल, तर आता एक आनंदाची बातमी आहे. विज्ञानाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. अमेरिकन कंपनी 'जॉबी एव्हिएशन'ने (Joby Aviation) त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीची यशस्वी चाचणी उड्डाणे सुरू केली आहेत. लवकरच ही टॅक्सी शहरांमधील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन उडताना दिसेल. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून शहरांमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे.

कॅलिफोर्नियात चाचण्यांना सुरुवात; FAA कडे प्रमाणन प्रलंबित
जॉबी एव्हिएशनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची चाचणी सध्या कॅलिफोर्नियातील मरीना येथील प्लांटमध्ये सुरू आहे. अनुभवी वैमानिक विविध हवामानांत आणि तांत्रिक परिस्थितीत या विमानाची चाचणी घेत आहेत. ही एअर टॅक्सी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर, तिला अमेरिकन एव्हिएशन नियामक संस्था 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन' (FAA) कडून अंतिम मंजुरी दिली जाईल. विशेष म्हणजे, कंपनीच्या विकास मॉडेल्सनी आतापर्यंत 50,000 मैलांपेक्षा जास्त उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

काय आहे एअर टॅक्सीची वैशिष्ट्ये?
ही एअर टॅक्सी म्हणजे 'इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग' (eVTOL) विमान आहे. याचे डिझाइन हेलिकॉप्टर आणि विमानाचे मिश्रण आहे. यामध्ये एक पायलट आणि 4 प्रवासी बसू शकतात. याचा कमाल वेग 321 किमी प्रति तास इतका आहे. एका चार्जवर हे विमान सुमारे 160 किमी पर्यंत उड्डाण करू शकते. पारंपारिक हेलिकॉप्टरच्या तुलनेत ही एअर टॅक्सी अत्यंत शांत आहे, ज्यामुळे शहरात ध्वनी प्रदूषण होणार नाही. यात 6 रोटर्स आहेत, जे त्याला उभ्या दिशेने उड्डाण करण्यास आणि उतरण्यास मदत करतात.

उबरच्या मदतीने 'अ‍ॅप'वरून बुक करता येणार राईड
प्रसिद्ध राईड-हेलिंग अ‍ॅप 'उबर' (Uber) आणि जॉबी एव्हिएशन यांच्यात या सेवेसाठी सहकार्य झाले आहे. भविष्यात तुम्ही तुमच्या मोबाईल अ‍ॅपवरून जशी कॅब बुक करता, तशीच एअर टॅक्सी बुक करू शकाल. तुमची संपूर्ण सहल एकाच बुकिंगमध्ये असेल.म्हणजे घरापासून टेक-ऑफ पॉईंटपर्यंत कारने नेले जाईल, तिथून एअर टॅक्सीने प्रवास होईल आणि लँडिंगनंतर पुन्हा कारने तुमच्या अंतिम पत्त्यावर सोडले जाईल.

हेही वाचा – Social Media New Platform: आता रोबोटसुद्धा मारणार एकमेकांशी गप्पा; झुकरबर्गने खरेदी केला चक्क ‘रोबोट्ससाठी नवा प्लॅटफॉर्म’

दुबईत या वर्षाअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता
जॉबी एव्हिएशनने आपली पहिली व्यावसायिक प्रवासी सेवा दुबईमध्ये या वर्षाच्या अखेरीस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दुबईत चार लँडिंग साइट्स (Vertiports) तयार केल्या जात असून, त्यापैकी दोन आधीच तयार झाल्या आहेत. दुबईतील यशानंतर ही सेवा अमेरिका आणि जगभरातील इतर मोठ्या शहरांमध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number