Shubman Gill Fined: गुजरातच्या थरारक विजयानंतर BCCI ने शुभमन गिलला ठोठावला 12 लाखांचा दंड; समोर आलं मोठं कारण

गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 धावेने पराभव करत विजय मिळवला. मात्र, या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Shubman Gill Fined: गुजरातच्या थरारक विजयानंतर BCCI ने शुभमन गिलला ठोठावला 12 लाखांचा दंड; समोर आलं मोठं कारण

Shubman Gill Fined: आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या एका अत्यंत थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 धावेने पराभव करत विजय मिळवला. मात्र, या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सामन्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने (BCCI) गिलवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शुभमन गिलवर दंडात्मक कारवाई का?
गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला असला तरी, कर्णधार शुभमन गिलला 'स्लो ओव्हर-रेट' (षटकांची गती मंद राखणे) या नियमाचा फटका बसला आहे. IPL ने जारी केलेल्या निवेदनानुसार, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या संघाने विहित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे, गिलला दोषी धरण्यात आले आहे. या हंगामातील ही संघाची पहिलीच चूक असल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

पुन्हा चूक झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद
जर गुजरात टायटन्सने या हंगामात पुन्हा 'स्लो ओव्हर-रेट'ची चूक केली, तर शिक्षेचे स्वरूप अधिक गंभीर असेल. दुसऱ्या चुकीसाठी कर्णधाराला 24 लाख रुपयांचा दंड होईल, तर प्लेइंग इलेव्हन आणि 'इम्पॅक्ट प्लेयर' मधील इतर खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये भरावे लागतील. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे तिसऱ्या चुकीनंतर कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालणारा जुना नियम आता रद्द करण्यात आला आहे.

थरारक सामना आणि गुजरातचा विजय
सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलसह तीन फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर 210 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या केएल राहुल (92) आणि पाथुम निसंका (41) यांनी वादळी सुरुवात करून दिली. डेव्हिड मिलरने शेवटपर्यंत झुंज दिली, परंतु विजयासाठी आवश्यक असलेली 1 धाव तो शेवटच्या चेंडूवर काढू शकला नाही आणि गुजरातने हा सामना खिशात घातला.

हेही वाचा – Smriti-Palash News: मुछालने घेतले स्मृतीच्या वडिलांचे आशीर्वाद! एका व्हायरल व्हिडिओमुळे स्मृती-पलाशचं नातं पुन्हा जुळणार?

रशीद खान ठरला विजयाचा शिल्पकार
दिल्लीची धावसंख्या 10 वे षटक संपण्यापूर्वीच 100 पार गेली होती, मात्र रशीद खानने सामन्याचे पारडे फिरवले. त्याने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 17 धावा देत 3 महत्त्वपूर्ण बळी टिपले. त्याने नितीश राणा, समीर रिझवी आणि अक्षर पटेल यांना बाद करत दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या प्रभावी कामगिरीमुळे रशीद खानला 'सामनावीर' (POTM) पुरस्काराने गौरवण्यात आले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number