Flight Ticket Hike : उन्हाळ्याची सुट्टी महाग पडणार! विमान तिकीट दरात 25 ते 30 टक्क्यांची मोठी वाढ, कुठे जाण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

वाढता उकाडा पाहता नागरिक थंड हवेच्या ठिकाणांना पसंती देत आहेत. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने एका दिवसाहून अधिक काळ लागत असल्याने लोक विमानप्रवासाला पसंती देत आहेत.

Flight Ticket Hike : उन्हाळ्याची सुट्टी महाग पडणार!  विमान तिकीट दरात 25 ते 30 टक्क्यांची मोठी वाढ, कुठे जाण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Flight Ticket Price Hike : उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या मुंबईकरांना आता विमान प्रवासासाठी खिसा रिकामा करावा लागत आहे. वाढती मागणी आणि विमान इंधनाच्या किमतीत झालेली वाढ यांमुळे देशांतर्गत विमान भाडे गगनाला भिडले असून तिकीट दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मे महिना हा हवाई वाहतुकीसाठी वर्षातील सर्वाधिक गर्दीचा काळ असल्याने विमान कंपन्यांनी दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे गोवा, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बजेटचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.

थंड हवेच्या ठिकाणांकडे वाढता ओढा
मुंबईतील वाढता उकाडा पाहता नागरिक थंड हवेच्या ठिकाणांना पसंती देत आहेत. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने उत्तर भारतात पोहोचण्यासाठी 30 तासांहून अधिक काळ लागत असल्याने पर्यटक विमानाचा पर्याय निवडत आहेत. याचाच परिणाम म्हणून मागणी वाढली असून तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. विशेषतः खालील मार्गांवर दरवाढ अधिक जाणवत आहे (हे दर मुंबईपासून आहेत) :

– श्रीनगर – श्रीनगरचे तिकीट 20 ते 21 हजार झाले आहे, जे एरव्ही 6 ते 7 हजार असते.
– लेह-लडाख: मुंबई ते लेह प्रवासासाठी आता 24 ते 25 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
– डेहराडून: नैनीतालकडे जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या विमानतळाचे तिकीट 18 ते 21 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
– धर्मशाळा: हिमाचल प्रदेशातील सिमला-मनालीला जाण्यासाठी 30 ते 31 हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.

धार्मिक पर्यटनाचाही वाढता ट्रेंड 
केवळ थंड हवेची ठिकाणेच नाही, तर आध्यात्मिक पर्यटनाकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली असून, मुंबई ते अयोध्या या मार्गावरील तिकीट दर इतर वेळच्या 5 ते 6 हजारांवरून आता 11 ते 12 हजार रुपयांच्या घरात गेले आहेत. जूनच्या मध्यापर्यंत पर्यटनाचा हा हंगाम सुरू राहणार असल्याने प्रवाशांना सध्यातरी या महागड्या प्रवासातून सुटका मिळण्याची चिन्हे नाहीत.

हेही वाचा – LPG PNG New Rules: 'एक घर, एक गॅस'! आता एकाच वेळी LPG आणि PNG वापरता येणार नाही; काय आहे केंद्र सरकारचा नवा नियम?

प्रमुख मार्गांवरील तिकीट दरांची तुलना (हजारात) पाहा
सध्याची दरवाढ आणि सर्वसामान्य वेळचे दर यांची तुलना केल्यास प्रवाशांना होणारा मनस्ताप स्पष्ट होतो. चंदीगडसाठी 19 ते 21 हजार रुपये मोजावे लागत असून बागडोगरा मार्गावर 16 ते 18 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. दक्षिण भारतात कोच्चीला जाण्यासाठी 20 ते 21 हजार तर गोव्यासाठी 10 ते 11 हजार रुपयांची तिकिटे विकली जात आहेत.

इंधन दरवाढ आणि मागणीचा परिणाम 
विमान प्रवासाकडे नागरिकांचा कल दरवर्षी वाढत आहे, मात्र यंदा विमान इंधनाचे दर वाढल्याने कंपन्यांनी हा बोजा प्रवाशांवर टाकला आहे. मुंबईत उन्हाळ्याचा कडाका असल्याने केवळ हिमालयीन परिसर हाच थंडावा देणारा पर्याय उरला आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील बागडोगरा असो वा दक्षिण भारतातील पर्यटन स्थळे, सर्वच ठिकाणी विमान प्रवासासाठी पर्यटकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

हेही वाचा –  Indian Railways: भारतीय रेल्वेचा कायापालट! 40 वर्षांची जुनी यंत्रणा बदलणार; आता 'AI' द्वारे तिकीटाची नवी कार्यप्रणाली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number