Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; दुहेरी नागरिकत्व प्रकरणी FIR नोंदवण्याचे आदेश, आता CBI करणार चौकशी!

तपासात आरोप सिद्ध झाले तर राहुल गांधींना केवळ खासदार पद तर गमवावे लागेलच; शिवाय, त्यांच्या राजकीय कारकीर्दीसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; दुहेरी नागरिकत्व प्रकरणी FIR नोंदवण्याचे आदेश, आता CBI करणार चौकशी!

Rahul Gandhi Dual Citizenship Case: काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय दिला आहे. त्यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाच्या वादावरून दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध FIR नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने रायबरेली पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण आणि आरोप काय आहेत?
भाजप नेते विग्नेश शिशिर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, राहुल गांधींकडे भारतासोबतच ब्रिटनचेही नागरिकत्व असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार, कोणत्याही व्यक्तीला दोन देशांचे नागरिकत्व (Dual Citizenship) एकाच वेळी धारण करता येत नाही. जर राहुल गांधींकडे ब्रिटनचे नागरिकत्व असेल, तर त्यांचे भारताचे नागरिकत्व रद्द होऊ शकते आणि पर्यायाने त्यांचे खासदार पदही धोक्यात येऊ शकते, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

रायबरेलीच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र, निवडणूक लढवताना त्यांनी आपल्या नागरिकत्वाबाबतची माहिती लपवली का, असा प्रश्न विग्नेश शिशिर यांनी कोर्टात उपस्थित केला. जर एका व्यक्तीकडे दुहेरी नागरिकत्व असेल, तर ती व्यक्ती भारतात निवडणूक लढवण्यास किंवा संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून बसण्यास पात्र नसते. याच कायदेशीर मुद्द्यावर आधारित न्यायालयाने आता कठोर पाऊल उचलले आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi on PM Narendra Modi: सभागृहातील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केला पंतप्रधानांचा अपमान, 'त्या' एका शब्दामुळे आली माफी मागण्याची वेळ

CBI कडे सोपवली चौकशीची सूत्रे
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारची मागणी मान्य केली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आली आहे. विग्नेश शिशिर यांनी असा दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाशी संबंधित काही अत्यंत गोपनीय (Top Secret) फायली न्यायालयासमोर मांडण्याची परवानगी दिली होती. या पुराव्यांच्या आधारेच न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला आहे.

कायदेशीर प्रक्रियेचा पुढचा टप्पा
आता या आदेशानंतर सीबीआय तातडीने तपासाची चक्रे फिरवणार असून राहुल गांधींच्या कथित ब्रिटिश नागरिकत्वाचे सत्य शोधून काढणार आहे. जर तपासात हे आरोप सिद्ध झाले, तर राहुल गांधींना केवळ खासदार पदच गमवावे लागणार नाही, तर त्यांच्या राजकीय कारकीर्दीसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. विग्नेश शिशिर यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Census India : जातनिहाय जनगणनेवर शिक्कामोर्तब; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची लोकसभेत मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number