बचत गटांची उत्पादनं आता ‘अॅमेझॉन’वर उपलब्ध

राज्यातील महिला बचतगटांमार्फत उत्पादीत होणारी विविध उत्पादने आता अॅमेझॉनवर मिळणार आहेत. बचतगटांमार्फत उत्पादीत झालेल्या ज्वेलरी, तूप, वेफर्स, कोसा सिल्क, तोरण, मसाले, चटण्या आदी विविध प्रकारच्या सुमारे १५० उत्पादनांचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अॅमेझॉन सहेली संकेतस्थळावर लॉंचींग करण्यात आले. ई-कॉमर्सच्या माध्यमातून राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अॅमेझॉन आणि महिला […]

बचत गटांची उत्पादनं आता ‘अॅमेझॉन’वर उपलब्ध

राज्यातील महिला बचतगटांमार्फत उत्पादीत होणारी विविध उत्पादने आता अॅमेझॉनवर मिळणार आहेत. बचतगटांमार्फत उत्पादीत झालेल्या ज्वेलरी, तूप, वेफर्स, कोसा सिल्क, तोरण, मसाले, चटण्या आदी विविध प्रकारच्या सुमारे १५० उत्पादनांचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अॅमेझॉन सहेली संकेतस्थळावर लॉंचींग करण्यात आले.

ई-कॉमर्सच्या माध्यमातून राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अॅमेझॉन आणि महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये आजची भागीदारी फार महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी बचतगटाद्वारे उत्पादित झालेल्या पहिल्या वस्तुची थेट अॅमेझॉन सहेलीच्या संकेतस्थळावर जाऊन खरेदी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number