Nashik Cloudburst Alert: नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, शाळा-कॉलेजेसना तात्काळ सुट्टी; मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन बैठकीनंतर मोठा निर्णय

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे.

Nashik Cloudburst Alert: नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, शाळा-कॉलेजेसना तात्काळ सुट्टी; मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन बैठकीनंतर मोठा निर्णय

Nashik Cloudburst Alert:  महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यात पुढील काही तासांत तब्बल 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता असून, तिथे ढगफुटीसदृश (Cloudburst) परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरातील 'मेजर डिप्रेशन'मुळे संकट गहिरे
हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Belt) आता तीव्र झाला असून त्याचे रूपांतर 'मेजर डिप्रेशन'मध्ये झाले आहे. या हवामान बदलाचा थेट फटका नाशिक आणि विशेषतः त्र्यंबकेश्वरच्या डोंगराळ घाटमाथ्याला बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याला येत्या 8 जुलैपर्यंत 'अतिवृष्टीचा इशारा' देण्यात आला असून, मंगळवारसाठी संपूर्ण जिल्ह्याला 'हाय-अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – Supriya Sule: एकाच पावसाने महाराष्ट्र कोलमडला! सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली 'ही' मोठी मागणी

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज
संभाव्य जलप्रलय आणि आपत्तीचा सामना करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यंत्रणा पूर्णपणे 'अॅक्शन मोड'मध्ये आली आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तात्काळ सुट्टी घोषित करण्यात आली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून, नागरिकांनी पुढील काही दिवस नाशिक किंवा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रवास करणे पूर्णपणे टाळावे, असे कडक आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number