मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक चारचाकी आणि आईस्क्रीमच्या टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण या दुर्घटनेत गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या मागच्या बाजूस कंटेनरची धडक बसल्याने सुदैवाने चारचाकीमधील प्रवासी बचावले आहेत. मौजम फायाजऊल्ल […]

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक चारचाकी आणि आईस्क्रीमच्या टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण या दुर्घटनेत गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या मागच्या बाजूस कंटेनरची धडक बसल्याने सुदैवाने चारचाकीमधील प्रवासी बचावले आहेत.

मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारीव (वय-३१) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चैतन्य कासने (वय-२४), नशिर अली अबु अन्सारी (वय-३३) , जयेश बाळाराम सपाट (वय-२५) अशी जखमींची नावे आहेत.

कंटेनर चालकाने फरफटत आणलेली कार आणि कंटेनर आईस्क्रीमच्या टेम्पोला धडकले. तर आईस्क्रीम खात उभे असलेले तीन ते चार जण दुचाकीसह चिरडले गेले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या मागच्या बाजूस कंटेनरची धडक बसल्याने सुदैवाने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number