Panvel Attack News: प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या भावावर पनवेलमध्ये जीवघेणा हल्ला? सोशल मीडियावर सांगितला थरार

सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्यावर पनवेलमध्ये हल्ला झाल्याच वृत्त आहे. याबात जन्नत झुबैरकडून अधिकृत निवेदन जारी केलं आहे.

Panvel Attack News: प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या भावावर पनवेलमध्ये जीवघेणा हल्ला? सोशल मीडियावर सांगितला थरार

Panvel Attack News: टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्यावर पनवेलमध्ये हल्ला झाल्याच वृत्त आहे. याबात जन्नत झुबैरकडून अधिकृत निवेदन जारी केलं आहे. ‘आम्ही अत्यंत खेदाने सर्वांना हे कळवू इच्छितो की, काल भरदिवसा महामार्गावर जन्नत आणि अयान यांना एका अतिशय त्रासदायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका धाडसी पाठलागानंतर त्यांच्यावर शारीरिक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रसंगामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासाचा अनुभव आला असला, तरी सध्याच्या घडीला जन्नत आणि अयान दोघेही सुरक्षित आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून सध्या तपास अत्यंत सक्रियपणे सुरू आहे. पोलीस अधिकारी दोषींचा शोध घेत असून, कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. अशा कठीण प्रसंगात तुम्ही दाखवलेली काळजी आणि जन्नत-अयानला दिलेल्या निरंतर पाठिंब्याबद्दल आम्ही संपूर्ण टीमच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो,’ असं निवेदनात सांगण्यात आलं आहे. 

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जन्नत आणि अयान काही कामासाठी पनवेल परिसरात गेले होते. तिथेच त्यांच्यावर हल्ला झाला असून या घटनेत दोघांनाही दुखापत झाल्याचा दावा सोशल मीडियावरील विविध पोस्टमध्ये केला जात आहे. 14 मार्चपासून या वृत्ताने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. जन्नत सध्या ‘लाफ्टर शेफ 3’ मुळे चर्चेत आहे, तर अयाननेही ‘जोधा अकबर’ सारख्या मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर कोट्यवधींच्या घरात फॅन फॉलोइंग असलेल्या या भावंडांच्या सुरक्षेबाबत चाहत्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Salman Khan New Movie Name : सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं नाव बदललं, स्वत: पोस्ट शेअर करत दिली माहिती, आता…

जन्नत आणि अयान ही जोडी नेहमीच एकत्र दिसते आणि सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अभिनेत्रीवर झालेल्या या हल्ल्याचा पोलीस तपास करत आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number