Mayank Pawar Death: फिटनेस विश्वात खळबळ; ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम आणि 7 वेळा ‘मिस्टर इंडिया’ ठरलेल्या मयंक पवारचे निधन

मयंकच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, त्याच्या जाण्याने त्याचे कुटुंबीय, चाहते आणि फिटनेस प्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mayank Pawar Death: फिटनेस विश्वात खळबळ; ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम आणि 7 वेळा ‘मिस्टर इंडिया’ ठरलेल्या मयंक पवारचे निधन

Mayank Pawar Death: रिअॅलिटी टीव्ही आणि फिटनेस विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर आली आहे. ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला’ सीझन 7 मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर मयंक पवार याचे अचानक निधन झाले आहे. मयंकच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, त्याच्या जाण्याने त्याचे कुटुंबीय, चाहते आणि फिटनेस प्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयंक केवळ एक टीव्ही कलाकार नव्हता, तर अनेक तरुणांसाठी तो फिटनेस आयकॉन होता.

सनी लिओनीही मयंकसाठी ढसाढसा रडली होती
‘स्प्लिट्सव्हिला 7’ मधील मयंकचा प्रवास अत्यंत भावनिक होता. त्याच्या शांत स्वभावामुळे आणि साधेपणामुळे त्याने सर्वांची मने जिंकली होती. जेव्हा त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले, तेव्हा शोची होस्ट सनी लिओनी स्वतःचे अश्रू रोखू शकली नव्हती. सनीने त्याला रडत मिठी मारली होती, जो या रिअॅलिटी शोच्या इतिहासातील सर्वात भावूक क्षण मानला जातो. इतकेच नाही तर कडक शिस्तीचे होस्ट निखिल चिनप्पा यांनीही सर्व नियम बाजूला सारून मयंकला मिठी मारत निरोप दिला होता.

फिटनेस विश्वातील ‘चॅम्पियन’ गमावला
मयंक पवारची ओळख केवळ एका शोपुरती मर्यादित नव्हती. त्याने तब्बल 7 वेळा ‘मिस्टर इंडिया’ हा किताब पटकावला होता आणि तो एकदा ‘मिस्टर इंडिया’चा ओव्हरऑल विनरही ठरला होता. एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून त्याने अनेकांचे आयुष्य बदलले. त्याच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर फिटनेस सप्लिमेंट्स आणि आरोग्याच्या गुंतागुंतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मयंकच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र अवघ्या काही दिवसांपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – Kantara Controversy: ‘तुम्ही रणवीर सिंग असाल तर मग काय झालं…’; कांतारा वादावरून हायकोर्टाने अभिनेत्याला सुनावलं

शोकसभेचे आयोजन
मयंकच्या सन्मानार्थ बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत राणा प्रताप बागेतील संगम पार्क येथील वाल्मिकी मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number