Viral Video Of Baby Monkey: सध्या सोशल मीडियावर एका छोट्या माकडाच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. जपानमधील ‘पंच’ नावाच्या या माकडाच्या हृदयस्पर्शी कहाणीने नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. या व्हिडिओचा परिणाम असा झाला की, स्वीडिश कंपनी IKEA चे एक साधे खेळणे आता जागतिक स्तरावर ‘बेस्टसेलर’ ठरले आहे.
आईने नाकारले, खेळण्याने सावरले
पंचचा जन्म जुलै 2025 मध्ये जपानच्या चिबा प्रांतातील इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयात झाला. जन्मानंतर लगेचच त्याच्या आईने त्याला स्वीकारण्यास नकार दिला. समूहातील इतर मोठ्या माकडांनीही त्याला दूर ढकलले. मायेच्या शोधात असलेल्या पंचला एकटे पडलेले पाहून प्राणीसंग्रहालय कर्मचाऱ्यांनी त्याला IKEA चा ‘डीजेंगेल्स्कॉग’ (DJUNGELSKOG) हा नारंगी रंगाचा ओरंगुटान प्लश (मऊ खेळणे) दिला. व्हायरल व्हिडिओमध्ये पंच या खेळण्याला घट्ट मिठी मारून बसलेला दिसतो. तो या खेळण्याशिवाय आता कुठेही जात नाही. नेटकऱ्यांनी या जोडीला ‘ओरन-मामा’ असे नाव दिले आहे.
काय आहे हे खास खेळणे?
पंच ज्या खेळण्याला बिलगून राहतो, ते IKEA च्या वन्यजीव संग्रहातील एक सॉफ्ट टॉय आहे. 66 सेमी लांबीच्या या ओरंगुटानचे हात लांब असून ते खऱ्या माकडाप्रमाणे कशालाही लटकू शकतात. पंचची प्रसिद्धी पाहून IKEA ने प्राणीसंग्रहालयाला आणखी काही खेळणी भेट दिली आहेत.
Lord please take away all of Punch pain away and give it to Diddy instead pic.twitter.com/Vn3tf0I0RB — kira ? (@kirawontmiss) February 19, 2026
किंमत आणि उपलब्धता
पंचच्या लोकप्रियतेमुळे या खेळण्याची मागणी प्रचंड वाढली आहे अमेरिकेत याची किंमत साधारण सुमारे 1650 रुपये आहे. तर भारतात आयकेईएच्या स्टोअर्समध्ये याची किंमत अंदाजे 842 रुपयांपासून सुरू होते. मात्र, मागणी वाढल्याने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हे खेळणे महागड्या किमतीतही विकले जात आहे. हा व्हिडिओ केवळ एका माकडाची कथा नसून, प्राणी आणि निर्जीव वस्तूंमधील भावनिक बंधाचे एक अनोखे उदाहरण ठरले आहे.