‘जळगावात ‘गुलाबो गँग’ची स्थापना’

जळगावातील पाचोऱ्यात उद्धव गटाची सभा आयोजित करण्यात आली आहे. तर, या सभेपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्तुत्तर दिले आहे. राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधत जळगावात गुलाबो गॅँगची स्थापना झाली असल्याचा टोला राऊतांनी गुलाबराव पाटलांना लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, […]

‘जळगावात ‘गुलाबो गँग’ची स्थापना’

जळगावातील पाचोऱ्यात उद्धव गटाची सभा आयोजित करण्यात आली आहे. तर, या सभेपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्तुत्तर दिले आहे. राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधत जळगावात गुलाबो गॅँगची स्थापना झाली असल्याचा टोला राऊतांनी गुलाबराव पाटलांना लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, जळगावमध्ये गुलाबो गॅँगची स्थापना झाली आहे. परंतु या जळगावावर लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल. इथे फक्त शिवसेनेचाच भगवा फडकेल. इतरांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. या सभेवरून लोक कुणासोबत आहेत हे सिद्ध झाले आहे, असे राऊत म्हणाले.

तसेच, आजच्या सभेवरून पाचोरा हे कडवट शिवसैनिकांचं आणि उद्धव ठाकरेंवर निष्ठा ठेवणाऱ्या शिवसैनिकांचं असल्यांचं सिद्ध झालं आहे. जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. परंतु या सुवर्ण नगरीमध्ये दगड निपजले. आम्हाला आव्हान देऊ म्हणतात, दगडं मारू म्हणतात, घुसून दाखवा म्हणतात. अजून किती घुसायचं, इथपर्यंत तर घुसलोच, असं म्हणत राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number