Blue Tick Case: एलोन मस्क यांच्या मालकीच्या ‘एक्स’ला 1080 कोटींचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण?

पारदर्शकता आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख नियमांचे उल्लंघन केल्याने X ला तब्बल 120 दशलक्ष युरोचा (सुमारे 1080 कोटी) दंड ठोठावण्यात आला आहे.<br/>

Blue Tick Case: एलोन मस्क यांच्या मालकीच्या ‘एक्स’ला 1080 कोटींचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण?

Blue Tick Case: एलोन मस्क यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर युरोपियन युनियनने (EU) डिजिटल सेवा कायदा (Digital Services Act – DSA) मोडल्याबद्दल मोठी कारवाई केली आहे. पारदर्शकता आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख नियमांचे उल्लंघन केल्याने X ला तब्बल 120 दशलक्ष युरोचा (सुमारे 1080 कोटी) दंड ठोठावण्यात आला आहे.

ब्लू टिकसह दिशाभूल करणारे डिझाइन

युरोपियन कमिशनच्या म्हणण्यानुसार, X वरील ब्लू चेकमार्कची रचना फसवी आढळली आहे. ही ब्लू टिक वापरकर्त्यांना दिशाभूल करू शकते. तसेच यामुळे बनावट खाती व घोटाळ्यांचा धोका वाढवतो, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले. आयोगाने ही रचना “फसवे डिझाईन” म्हणून घोषित केली असून ती EU च्या ऑनलाइन सुरक्षा मानकांचे उल्लंघन करते, असे स्पष्ट केले.

जाहिरात डेटाबेसमध्ये पारदर्शकता अपुरी

दरम्यान, DSA नुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना त्यांच्या सर्व जाहिरातींसंबंधी खुला आणि स्पष्ट डेटाबेस ठेवणे बंधनकारक आहे. त्यात जाहिरात कोणी दिली, कोणाला उद्देशून दिली, तिचा हेतू काय हे सर्व स्पष्ट असणे आवश्यक आहे. मात्र तपासात दिसून आले की X चा जाहिरात डेटाबेस अपूर्ण, प्रवेशास कठीण आणि विलंब करणारा आहे. यामुळे संशोधकांना फसव्या जाहिराती किंवा प्रचार ओळखणे आव्हानात्मक ठरते, असे EU ने नमूद केले.

हेही वाचा – Donald Trump FIFA Peace Prize : नोबेल नाही पण फिफाने पूर्ण केली इच्छा! ..आणि एकदाचा ट्रम्प यांना शांतता पुरस्कार मिळाला

संशोधकांसाठी डेटा मिळवण्यात अडथळे

तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली. एक्समुळे संशोधकांना आवश्यक डेटा मिळवण्यासाठी अनावश्यक अडथळे निर्माण होत आहेत. युरोपियन आयोगाने ही कृती पारदर्शकतेच्या तत्वांच्या विरोधी असल्याचे म्हटले आहे. फसवे डिझाइन, जाहिराती लपवणे आणि संशोधनात अडथळे निर्माण करणे हे युरोपियन डिजिटल कायद्यांतर्गत स्वीकारार्ह नाही. 

हेही वाचा – Mass Shooting at South African Bar: दक्षिण आफ्रिकेतील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; 3 मुलांसह 11 जणांचा मृत्यू

एक्ससाठी मोठा धक्का

या कारवाईनंतर X वर मोठा आर्थिक व कायदेशीर दबाव निर्माण झाला आहे. डिजिटल सेवा कायदा मोडल्यास कठोर दंडाची तरतूद आहे आणि X च्या प्रकरणाने युरोपियन युनियनचा डिजिटल सुरक्षेबाबतचा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number