Indrayani River Flood: इंद्रायणीच्या महापुरानंतर आळंदीसाठी एकनाथ शिंदेंकडून 10 कोटींचा आपत्कालीन निधी; दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले असून, आळंदीतील महत्त्वाचे 4 पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे शहरातील नागरी सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

Indrayani River Flood: इंद्रायणीच्या महापुरानंतर आळंदीसाठी एकनाथ शिंदेंकडून 10 कोटींचा आपत्कालीन निधी; दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

Indrayani River Flood: पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले असून, आळंदीतील महत्त्वाचे 4 पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे शहरातील नागरी सुविधांचे मोठे नुकसान झाले असून वारकरी आणि स्थानिक नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. या संकटाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीच्या तातडीच्या पुनर्बांधणीसाठी आणि विकासकामांसाठी 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) देखील जारी करण्यात आला आहे.

या कामांसाठी वापरला जाणार निधी
आषाढी वारीच्या तोंडावर आलेल्या या पुरामुळे विस्कळीत झालेली व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने:

– पाणीपुरवठा यंत्रणा आणि जलशुद्धीकरण केंद्रांची दुरुस्ती
– पूरबाधित रस्ते, पूल आणि पथदिव्यांची तातडीने पुनर्बांधणी
– सार्वजनिक शौचालये आणि इतर नागरी सुविधांची डागडुजी

वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर प्रशासनाने एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीची पाणी पातळी आणि पूर ओसरेपर्यंत वारकऱ्यांनी आळंदीमध्ये गर्दी करू नये. सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाविकांनी थेट पुणे, पिंपरी-चिंचवड किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे जिल्हा प्रशासन आणि देवस्थान संस्थांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – Heavy Rainfall Forecast: राज्यावर अस्मानी संकट! पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे; 9 जिल्ह्यांना यलो तर 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

पालखी प्रस्थानाचे वेळापत्रक
पुणे जिल्हा, मावळ आणि देहू परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे दोन्ही देवस्थानांच्या परिसरात सतर्कता बाळगली जात आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाले असून, आज पालखीचा मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात असेल. तर उद्या, 8 जुलै रोजी माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी आळंदीतून प्रस्थान ठेवेल. बुधवारी माऊलींची पालखी आळंदीतील गांधी वाड्यात मुक्कामी असेल, तर त्याच दिवशी तुकोबांची पालखी आकुर्डी येथे मुक्कामासाठी पोहोचेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number