Eknath Khadse : ‘भाजपकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार’; एकनाथ खडसेंचा भाजपवर प्रहार

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या उमेदवारी वाटपावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपने अशा लोकांना तिकिटे दिली आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, ज्यांची ओळख 'गुंड' म्हणून आहे.

Eknath Khadse : ‘भाजपकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार’; एकनाथ खडसेंचा भाजपवर प्रहार

Maharashtra Municipal Corporation Election 2026 : मुंबई आणि महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. जळगाव आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये भाजपने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. जळगावमध्ये ज्या पद्धतीने जागा बिनविरोध निवडून आणल्या गेल्या, तो लोकशाहीचा विजय नसून दहशतीचा विजय असल्याचे खडसे यांनी नमूद केले.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा मुद्दा
एकनाथ खडसे यांनी भाजपच्या उमेदवारी वाटपावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपने अशा लोकांना तिकिटे दिली आहेत ज्यांच्यावर हत्येचे गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत आणि ज्यांची ओळख ‘गुंड’ म्हणून आहे. एका विशिष्ट प्रकरणात जेव्हा मीडियाने प्रश्न उचलला आणि जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली, तेव्हा कुठे एका स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, उर्वरित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे काय? असा थेट सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Navneet Rana : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी माजी खासदार नवनीत राणांना न्यायालयाकडून मोठा दिलासा

जळगावमधील ‘बिनविरोध’ निवडणुकीचे गौप्यस्फोट
जळगाव शहरात झालेल्या बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भात खडसे यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या मते, जळगावमध्ये प्रथमच अशा प्रकारची भीती आणि दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले. 200 ते 300 लोकं विरोधकांच्या घरावर जाऊन धाड टाकायचे, त्यांना धमकावायचे आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी 20 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या जायच्या. याच सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर जळगावमधील 11 जागा बिनविरोध झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, ही पद्धत महाराष्ट्रासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक आणि जळगावमधील या राजकीय घडामोडींनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. खडसे यांनी स्पष्ट केले की, जरी सत्तेचा गैरवापर करून आज जागा जिंकल्या जात असल्या तरी, आगामी काळात जनता अशा प्रवृत्तींना योग्य ते प्रत्युत्तर देईल. महापालिका निवडणुकीत पैशांचा आणि दहशतीचा होणारा वापर रोखणे हे लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

हेही वाचा – Nitesh Rane : मोठी बातमी! नितेश राणेंच्या ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग; घातपाताचा संशय? मुंबई पोलीस सतर्क

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number