Goa Nightclub Fire Case: लुथरा बंधूंच्या नऊ ठिकाणांवर ED चे छापे; मनी लाँडरिंगचा तपास सुरू

ईडीच्या गोवा युनिटने ही कारवाई प्रामुख्याने क्लबचे प्रवर्तक सौरभ आणि गौरव लुथरा तसेच अजय गुप्ता यांच्याशी संबंधित जागांवर केली आहे.

Goa Nightclub Fire Case: लुथरा बंधूंच्या नऊ ठिकाणांवर ED चे छापे; मनी लाँडरिंगचा तपास सुरू

Goa Nightclub Fire Case: गोव्यातील आर्पोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' (Birch by Romeo Lane) नाईटक्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणातील कथित आर्थिक अनियमितता आणि मनी लाँडरिंगचा तपास करण्यासाठी शुक्रवारी दिल्ली, गोवा आणि हरियाणातील 9 ठिकाणी जोरदार शोधमोहीम राबवली. ईडीच्या गोवा युनिटने ही कारवाई प्रामुख्याने क्लबचे प्रवर्तक सौरभ आणि गौरव लुथरा तसेच अजय गुप्ता यांच्याशी संबंधित जागांवर केली आहे. यामध्ये दिल्लीतील 5, गोव्यातील 3 आणि हरियाणाच्या गुरुग्राममधील 1 ठिकाणासह त्यांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात येत आहे.

सरकारी अधिकारी आणि स्थानिक नेते रडारवर 

या कारवाईत केवळ व्यावसायिकच नव्हे, तर गैरप्रकारात मदत केल्याचा संशय असलेले सरकारी अधिकारीही ईडीच्या रडारवर आले आहेत. गोव्यातील तत्कालीन सरपंच रोशन रेडकर आणि पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्या निवासस्थानांचीही झडती घेण्यात आली. या दोघांनी क्लबला बेकायदेशीर व्यापार परवाने आणि ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) मिळवून दिल्याचा प्राथमिक आरोप आहे. याव्यतिरिक्त, ज्या 'खाजन' (मिठागराच्या) जमिनीवर हा क्लब बांधला होता, त्या जमिनीच्या बेकायदेशीर रूपांतरणाबाबत सुरिंदर कुमार खोसला यांच्या मालमत्तांचीही चौकशी केली जात आहे.

हेही वाचा – Sajjan Kumar : मोठी बातमी! 1984 शीख दंगल प्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची आरोपातून निर्दोष मुक्तता

25 जणांचा मृत्यू आणि प्रवर्तकांचे पलायन 

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आहे. 6 डिसेंबर 2025 रोजी 'बर्च बाय रोमियो लेन' येथे झालेल्या भीषण आगीत 25 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्य प्रवर्तक असलेले लुथरा बंधू तातडीने थायलंडला पळून गेले होते. मात्र, त्यांना 17 डिसेंबर रोजी भारतात परत आणण्यात आले असून, सध्या ते गोवा पोलिसांच्या ताब्यात आहेत. सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अवैध बांधकामातून मिळालेल्या आर्थिक फायद्याचा (Money Laundering) तपास आता 'PMLA' कायद्यांतर्गत केला जात आहे.

तपासाचा मुख्य उद्देश 

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या शोधमोहिमेचा मुख्य उद्देश संबंधित संस्थांच्या मालकी हक्काची कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि परवान्यांसाठी दिलेल्या लाचेच्या स्वरूपातील पैशांचा माग काढणे हा आहे. डिसेंबरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोव्यातील नाईटक्लब्समधील सुरक्षा आणि नियामक त्रुटींबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली होती. आता केंद्रीय यंत्रणेच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणातील अनेक बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number