Sindhudurg Earthquake: सिंधुदुर्गात भूकंपासारख्या धक्क्यांनी खळबळ; घरांच्या भिंतींना मोठे तडे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या अनपेक्षित आणि गूढ धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात एकच घबराट आणि खळबळ उडाली आहे. अचानक जमीन हादरल्याचा जाणीव होताच नागरिक भीतीपोटी आपल्या घराबाहेर रस्त्यावर धावून आले.<br/>

Sindhudurg Earthquake: सिंधुदुर्गात भूकंपासारख्या धक्क्यांनी खळबळ; घरांच्या भिंतींना मोठे तडे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sindhudurg Earthquake: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, विद्यानगर आणि बेलदारवाडी या परिसराला भूकंपासारख्या तीव्र धक्क्यांनी अचानक हादरवून सोडले. या अनपेक्षित आणि गूढ धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात एकच घबराट आणि खळबळ उडाली आहे. अचानक जमीन हादरल्याचा जाणीव होताच नागरिक भीतीपोटी आपल्या घराबाहेर रस्त्यावर धावून आले.

4 घरांचे नुकसान; घरांना पडल्या मोठ्या भेगा
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील किमान 4 घरांना मोठी झळ बसली आहे. धक्क्यांची तीव्रता इतकी होती की, या बाधित 4 घरांच्या भिंतींना मोठ्या आणि धोकादायक भेगा पडल्या आहेत. भिंती खचल्याने आणि तडे गेल्याने घरांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, ही घरे राहण्यासाठी असुरक्षित बनली आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, योजनेच्या पैशांबाबत आली सर्वात मोठी अपडेट! जाणून घ्या, जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार

सरपंचांकडून घटनास्थळाची पाहणी आणि मदतीचे आश्वासन
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आग्रे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी आज सकाळीच विद्यानगर-बेलदारवाडी परिसराला भेट दिली. सरपंच आग्रे यांनी बाधित झालेल्या 4 ही घरांची आणि कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन नुकसानीची सविस्तर पाहणी केली. तसेच, घाबरलेल्या नागरिकांना धीर देत प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या धक्क्यांचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number