31 December Party : तळीरामांचा 31 डिसेंबर साबुदाणा खिचडीवर?; नेमकं कारण काय

अवघ्या काही तासांत 2025 हे वर्ष संपणार असून हे जग नवीन वर्षात पदार्पण करणार आहे.

31 December Party : तळीरामांचा 31 डिसेंबर साबुदाणा खिचडीवर?; नेमकं कारण काय

अवघ्या काही तासांत 2025 हे वर्ष संपणार असून हे जग नवीन वर्षात पदार्पण करणार आहे. दरवर्षी 31 डिसेंबरची रात्र नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने जल्लोषात, उत्साहात साजरी केली जाते. वार कोणताही असो, 31 डिसेंबर रोजी पार्टी हमखास होते. यंदाच्या वर्षीदेखील सर्वत्र जोषात पार्टीची तयारी सुरू आहे. मात्र यंदाची 31 डिसेंबर ही काहीशी वेगळी असणार आहे. 31 डिसेंबर हा दिवस बुधवारी येत असला तरी या दिवशी भागवत एकादशी येत आहे. त्यामुळे बहुतांश लोकं एकादशी पाळत असून या दिवशी उपवास करणे पसंत करतात. तर 31 डिसेंबरच्या रात्री 12 ठोक्यानंतर नवीन वर्षाचे आगमन होताच गुरुवारचा दिवस सुरू होत आहे. त्यामुळे ज्यांचा ज्यांचा गुरुवारी उपवास असतो, तेदेखील यंदाच्या पार्टीतील लज्जतदार मेजवानीला मुकणार आहेत. पार्टी म्हटलं की मद्य आणि मांसाहार हे समीकरण सर्रास दिसते. परंतू यंदाचा 31 डिसेंबरचा दिवस तळीरामांना साबुदाण्याची खिचडी खाऊन घालवावा लागणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अर्थात, सगळेच एकादशी किंवा गुरुवार हे दिवस पाळून उपवास करतातच असे नाही. मात्र एकादशी आणि गुरुवार हा योगायोग यंदा 31 ला आला असल्याने यासंबंधीतील अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मासांहार करावे की नाही, उपवास धरावा की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मजेचा भाग म्हणून यंदाच्या 31 डिसेंबर, तळीरामांची पंचायत, एकादशी आणि उपवास या सर्व गोष्टींकडे पाहिले जात आहे. 

पाहुया सोशल मीडियावरील काही मजेशीर मिम्स –

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number