Mumbai Indians vs Chennai Super King : आयपीएलमधील सर्वात मोठी लढत मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याची सुरुवात एका गोंधळाने झाली. वानखेडे स्टेडियमवर टॉससाठी दोन्ही कर्णधार मैदानात आले असताना, माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर रवी शास्त्री यांच्या एका चुकीमुळे मैदानात काही काळ शांतता पसरली आणि नंतर एकच हशा पिकला.
नेमकं काय घडलं ?
सामन्याचा नाणेफेक (Toss) करण्यासाठी हार्दिक पांड्या आणि ऋतुराज गायकवाड सज्ज होते. यावेळी रवी शास्त्रींनी हार्दिकची ओळख करून दिली, मात्र चेन्नईच्या कर्णधाराची ओळख करून देताना त्यांची जीभ घसरली. ऋतुराज गायकवाडचे नाव घेताना शास्त्री काही सेकंद पूर्णपणे विसरले. काही क्षण थांबल्यानंतर त्यांना नाव आठवले आणि मग त्यांनी ऋतुराजचे नाव घेतले. या ‘ऑकवर्ड’ प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हार्दिकने जिंकला टॉस; ऋतुराजचे धोनीला श्रेय
दरम्यान, टॉस जिंकून हार्दिकने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो म्हणाला, “मैदानावर जोश असणे महत्त्वाचे आहे. आम्ही खेळाचा आनंद घेत आहोत आणि ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम असेल.” तथापी, ऋतुराजने मैदानावरील चाहत्यांच्या उदंड प्रतिसादाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले. तो म्हणाला, “आम्ही जिथे जातो तिथे चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळतो, याचे सर्व श्रेय महान धोनीला जाते. दुर्दैवाने ते आज येथे नाहीत, पण त्यांच्यामुळेच हा जल्लोष आहे.”
?Toss update from Mumbai?@mipaltan won the toss and elected to bowl first against @ChennaiIPL Updates ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK pic.twitter.com/nDH0Nw23eD — IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
रवी शास्त्रींच्या चुकांची मालिका
शास्त्रींनी टॉस दरम्यान गोंधळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी वर्ल्ड कपमध्येही त्यांनी अशीच चूक केली होती. काही दिवसांपूर्वी एका सामन्यात ते कर्णधारांना ‘Playing 11’ विचारण्यासही विसरले होते. आजच्या विसरभोळेपणामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.