Aditi Tatkare: ‘1500 रुपये मिळताच शॉपिंग…’; आदिती तटकरेंचा लाडक्या बहिणींबद्दल काय बोलून गेल्या?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधला.

Aditi Tatkare: ‘1500 रुपये मिळताच शॉपिंग…’; आदिती तटकरेंचा लाडक्या बहिणींबद्दल काय बोलून गेल्या?

Aditi Tatkare: वाशिम येथे महिला व बालकल्याण विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधला. या योजनेद्वारे मिळणाऱ्या अनुदानाचा वापर केवळ दैनंदिन खरेदी किंवा शॉपिंगसाठी न करता, महिलांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी बचत सवय अंगीकारावी, असा महत्त्वपूर्ण मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – Devendra Fadnavis: ‘मी महाराष्ट्रात आहे आणि इथेच…’; दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

1500 रुपयांतील काही रक्कम बँकांमध्ये किंवा बचत गटात ठेवा
आपल्या संबोधनात आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य सरकारकडून दरमहा मिळणारे 1500 रुपये पूर्णपणे खर्च न करता, त्यातील 500 रुपये किंवा शक्य ती रक्कम स्थानिक बचत गट, बँक अथवा पतसंस्थेमध्ये जमा करावी. अशा प्रकारच्या छोट्या बजतीतून उभा राहणारा निधी महिलांना भविष्यात ऐनवेळी निर्माण होणाऱ्या अडचणींच्या काळात अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यापाऱ्यांची उत्सुकता आणि बाजारातील आर्थिक उलाढाल

या प्रसंगी तटकरे यांनी एक रंजक अनुभवही उपस्थितांसोबत शेअर केला. त्या म्हणाल्या, “अनेकदा शहरांमधील व्यापारी वर्गच आम्हाला योजनेचे हप्ते कधी जमा होणार, अशी विचारणा करत असतो. एका व्यापाऱ्याला याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की ज्या दिवशी महिलांच्या खात्यात 1500  रुपये जमा होतात, त्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत बाजारात खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यावरून ही योजना स्थानिक बाजारपेठेला आणि अर्थचक्राला मोठी गती देत असल्याचे स्पष्ट होते.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number