Donald Trump : ‘भारताला प्रगतीसाठी जे काही हवे असेल..’; ट्रम्प यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाले, ‘अमेरिका सर्व काही..’

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत देश कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेवर 100 टक्के विश्वास ठेवू शकतो आणि अवलंबून राहू शकतो. मात्र, ट्रम्प आणि अमेरिकेचा आजवरचा इतिहास पाहता...

Donald Trump : ‘भारताला प्रगतीसाठी जे काही हवे असेल..’; ट्रम्प यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाले, ‘अमेरिका सर्व काही..’

Donald Trump on 250th US independence Day : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट फोनद्वारे संवाद साधत भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत स्थितीत असल्याचे सांगितले. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी ट्रम्प यांना फोन लावला असता, स्पीकरवरून उपस्थितांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत कौतुकाचे उद्गार काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे उत्तम मित्र असून ते एक महान नेते आहेत, अशा शब्दांत ट्रम्प यांनी त्यांचे कौतुक केले. ट्रम्प पुढे म्हणाले, "माझं भारतावर मनापासून प्रेम आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध आज ज्या उंचीवर आहेत, तितके ते यापूर्वी कधीही नव्हते." या संवादादरम्यान त्यांनी संपूर्ण भारतीयांना 'शुभ सायंकाळ' म्हणत शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधील वाढत्या विश्वासाचा पुनरुच्चार केला.

'भारताला हवं ते मिळेल, आमच्यावर 100 टक्के विश्वास ठेवा'
अवलंबित्वाची हमी: डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत देश कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेवर 100 टक्के विश्वास ठेवू शकतो आणि अवलंबून राहू शकतो.
आर्थिक सुबत्ता: सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार विक्रमी पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे भारताला प्रगतीसाठी जे काही हवे असेल, ते पुरवण्यास अमेरिका पूर्णपणे सक्षम आणि तयार आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री 9 च्या सुमारास (वॉशिंग्टनमध्ये सकाळी 11:30 वाजता) झालेल्या या थेट संवादाला भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांच्यासह सुमारे 1500 मान्यवर उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात दोन्ही देशांच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांनी द्विपक्षीय भागीदारीच्या नव्या पर्वाचे स्वागत केले.

हेही वाचा – Iran-US Conflict: इराणने अखेर हात टेकले? युरेनियम, परमाणु हत्यार अमेरिकेच्या ताब्यात देणार, होणार मोठा करार

पुढील 5 वर्षांत 500 अब्ज डॉलरचा व्यापार
याच कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांचा भविष्यातील रोडमॅप जाहीर केला. भारत पुढील 5 वर्षांत अमेरिकेकडून तब्बल 500 अब्ज डॉलरच्या उत्पादनांची खरेदी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने तंत्रज्ञान, ऊर्जा उत्पादने, विमाने व विमानांचे सुटे भाग, कृषी क्षेत्र, मौल्यवान धातू आणि कोकिंग कोळसा या घटकांचा समावेश असेल.

व्यापार असंतुलन दूर करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने जागतिक स्तरावर जी धोरणात्मक पावले उचलली आहेत, हा त्याचाच एक भाग असल्याचे रुबिओ यांनी स्पष्ट केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांची गती मंदावली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ट्रम्प प्रशासनाचा हा दृष्टिकोन कोणत्याही एका विशिष्ट देशाच्या विरोधात नसून, संपूर्ण जागतिक व्यापाराला अधिक शाश्वत आणि संतुलित करण्यासाठी आहे, असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या आतापर्यंतच्या संशयास्पद आणि भारतविरोधी भूमिका
दरम्यान, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून आतापर्यंत अनेक भारतविरोधी निर्णय घेतले आहेत. तसेच, अमेरिका फर्स्ट या धोरणांतर्गत अनेक भारतासह जगभरातील अनेक देशांविरोधात अन्यायकारक आणि अपमानकारक धोरणे लागू केली आहेत. शिवाय, वेळोवेळी अनेक उलट-सुलट वक्तव्ये करत जगभरात स्वतःच्या विश्वासार्हतेबाबत शंकास्पद स्थिती निर्माण केली आहे. या सर्व बाबींमधून भारताचे जगातले दिवसेंदिवस बळकट होत असलेले स्थान अमेरिकेला खुपत आहे, हेच स्पष्ट दिसते. अशा स्थितीत भारताने अमेरिकेवर कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवावा, असे वातावरण नसल्यामुळे सावधानतेने स्वतःच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती पावले टाकणे हेच भारतासाठी केव्हाही योग्य आणि श्रेयस्कर ठरेल. उलट्या काळजाच्या बेभरवशी अमेरिकेवर विश्वास ठेवणे तर दूरच, उलट अमेरिकेपासून सावध राहणेच भारतासाठी उचित ठरेल.

हेही वाचा – Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार! इराण नरमला, जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा; डोनाल्ड ट्रम्प यांचेही महत्त्वाचे संकेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number