Dombivli Lezim World Record: डोंबिवलीची ख्याती आता सातासमुद्रापार; 9111 रणरागिणींच्या लेझीम तालावर गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड

सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर तब्बल 9,111 महिला आणि विद्यार्थिनींनी एकाच तालावर लेझीम घुमवत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

Dombivli Lezim World Record: डोंबिवलीची ख्याती आता सातासमुद्रापार; 9111 रणरागिणींच्या लेझीम तालावर गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड

Dombivli Lezim World Record: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीने आज जागतिक नकाशावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर तब्बल 9,111 महिला आणि विद्यार्थिनींनी एकाच तालावर लेझीम घुमवत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या अथांग 'नारीशक्ती'च्या आविष्कारामुळे सांगलीचा जुना विक्रम मोडीत निघाला असून, डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सांगलीचा विक्रम इतिहासजमा
यापूर्वी एकाच वेळी 7,338 महिलांनी लेझीम खेळण्याचा विक्रम सांगलीच्या नावावर नोंदवला गेला होता. मात्र, रविवारी डोंबिवलीत 9,111 महिलांनी एकत्र येत हा आकडा मोठ्या फरकाने पार केला. 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे लंडनहून आलेले प्रतिनिधी स्वप्नील डांगरेकर यांनी या विक्रमाची अधिकृत घोषणा केली आणि त्याचे प्रमाणपत्र सुहासिनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.

पाच मिनिटांचा थरार आणि संस्कृतीचा जागर
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' आणि 'कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणाचे वैशिष्ट्ये म्हणजे सलग 5.30 मिनिटे महिलांनी विविध लेझीम प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांमधील विद्यार्थिनी आणि विविध क्षेत्रांतील महिला भगिनींनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सशक्त भारत' संकल्पाला बळ देण्यासाठी या पारंपारिक शारीरिक व्यायामाच्या कलेचे सादरीकरण करण्यात आले.

आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "हा जागतिक विक्रम मी भारतमातेच्या चरणी समर्पित करतो. लेझीम ही आपली संस्कृती आहे आणि ती जपण्याचे काम या लेकींनी समर्थपणे केले आहे."

हेही वाचा – Donkey Farming Scheme: केंद्र सरकारची अनोखी योजना! आता गाढव पाळा आणि मिळवा तब्बल इतके टक्के अनुदान; अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

'जय श्रीराम'च्या घोषात सोहळा संपन्न
पहाटेपासूनच डोंबिवलीकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मैदानावर मोठ्या संख्येने जमले होते. लेझीमचा खणखणाट, ढोल-ताशांचा गजर आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. विक्रमाची घोषणा होताच महिलांनी गुलाल उधळून आणि फेर धरून मोठा जल्लोष साजरा केला.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number