Missing Link Project: मिसिंग लिंक सुरू होऊनही एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा; मनसे नेते अभिजित पानसे यांनी व्हिडीओ शेअर करत केला संताप व्यक्त

मनसे नेते अभिजित पानसे स्वतः या वाहतूक कोंडीत अडकले होते. खंडाळा घाटात तब्बल 40 मिनिटे रखडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत प्रशासनाच्या नियोजनावर ताशेरे ओढले.

Missing Link Project: मिसिंग लिंक सुरू होऊनही एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा; मनसे नेते अभिजित पानसे यांनी व्हिडीओ शेअर करत केला संताप व्यक्त

Missing Link Project: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास वेगवान करण्यासाठी ज्या ‘मिसिंग लिंक’चे (कनेक्टिंग लिंक) थाटामाटात उद्घाटन करण्यात आले, त्यावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. ही लिंक प्रवाशांसाठी खुली झाल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी प्रत्यक्षात पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद असल्याने प्रवाशांना आजही महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

“मिसिंग लिंक इज मिसिंग!” – पानसेंचा संताप
मनसे नेते अभिजित पानसे स्वतः या वाहतूक कोंडीत अडकले होते. खंडाळा घाटात तब्बल 40 मिनिटे रखडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत प्रशासनाच्या नियोजनावर ताशेरे ओढले. “कालच प्रकल्पाचे उद्घाटन झाले, पण आज मुंबईकडे येताना रस्ते जाम आहेत. ही मिसिंग लिंक नक्की कुठे हरवली आहे? ती शोधण्यासाठी पोलिसात तक्रार द्यावी लागेल का?” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

मुंबईकडे जाणारी मार्गिका का आहे बंद?
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू झाली असली तरी पुण्याहून मुंबईकडे येणारा रस्ता अद्याप सुरू झालेला नाही. या मार्गावर स्वच्छता आणि सुरक्षेचे बॅरिकेट्स हटवण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने हा अडथळा निर्माण झाला आहे. शनिवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होऊन मार्गिका खुली होणे अपेक्षित होते, मात्र तोपर्यंत प्रवाशांना जुन्याच मार्गाने तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

मुंबई-गोवा महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा
एकीकडे एक्सप्रेसवेवर ही स्थिती असताना दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गाची अवस्थाही बिकट आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणाकडे धाव घेतल्याने माणगाव आणि इंदापूर परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर फाटा या दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचे हाल होत असून, प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे.

हेही वाचा – CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मिडियावर ट्रेंडिंगला, ‘InframanDevabhau’हॅशटॅग वापरून होतंय कौतुक

प्रशासनाकडून स्पष्टीकरण
रस्त्यावरील बॅरिकेट्स काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पुण्याहून मुंबईकडे जाणारी लेन सुरू केली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पर्यटनासाठी निघालेल्या चाकरमान्यांच्या आनंदावर या वाहतूक कोंडीमुळे विरजण पडले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number