Delhi Metro : दिल्ली मेट्रोच्या फेज 5A ला मंजुरी! 13 नवीन स्थानके उभारली जाणार; एकूण खर्च किती ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्ली मेट्रोच्या फेज 5A विस्ताराला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.

Delhi Metro : दिल्ली मेट्रोच्या फेज 5A ला मंजुरी! 13 नवीन स्थानके उभारली जाणार; एकूण खर्च किती ?

Delhi Metro : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्ली मेट्रोच्या फेज 5A विस्ताराला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 12,015 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे दिल्लीतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

13 नवीन स्थानके

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, या नवीन विस्तारामुळे दिल्ली मेट्रोचे नेटवर्क 16 किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पात एकूण 13 नवीन स्थानके बांधली जातील, ज्यामध्ये 10 स्थानके भूमिगत (Underground) आणि 3 स्थानके उन्नत (Elevated) असतील.

विस्तार होणारे महत्त्वाचे मार्ग 

दिल्ली मेट्रोचा विस्तार प्रामुख्याने तुघलकाबाद ते कालिंदी कुंज, रामकृष्ण आश्रम ते इंद्रप्रस्थ, एरोसिटी ते टर्मिनल 1 या तीन महत्त्वाच्या कॉरिडॉरवर केला जाईल. 

हेही वाचा – Nitin Gadkari : 'दिल्लीत 3 दिवस राहिलो तरी मला अ‍ॅलर्जी..'; प्रदूषणावर नितीन गडकरींचे रोखठोक भाष्य

3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

या मेट्रो विस्तार प्रकल्पाचे काम आगामी 3 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पानंतर दिल्ली मेट्रोचे एकूण नेटवर्क 400 किलोमीटरचा टप्पा ओलांडणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे 6.5 दशलक्ष प्रवासी दिल्ली मेट्रोने प्रवास करतात. या नवीन विस्तारामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी भर पडणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

हेही वाचा – Ration Card New Rules : रेशन कार्डासंबंधी नवा नियम! सलग 6 महिने धान्य न घेतल्यास कार्ड होणार निष्क्रिय

प्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर उपाय

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, मेट्रोच्या विस्तारामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवता येईल. अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'हा प्रकल्प दिल्लीकरांसाठी गेम चेंजर ठरेल.'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number