Delhi Capitals New Captain: विश्वचषक गाजवल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सची धुरा ‘या’ खेळाडूकडे

ऑस्ट्रेलियाची दिग्गज मेग लॅनिंग हिच्या जागी भारताची आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिची दिल्ली कॅपिटल्सच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.<br/>

Delhi Capitals New Captain: विश्वचषक गाजवल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सची धुरा ‘या’ खेळाडूकडे

Delhi Capitals New Captain: महिला प्रीमियर लीग 2026 (WPL 2026) च्या रणधुमाळीपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या नेतृत्वात मोठी खांदेपालट केली आहे. ऑस्ट्रेलियाची दिग्गज मेग लॅनिंग हिच्या जागी भारताची आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिची दिल्ली कॅपिटल्सच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मेग लॅनिंगच्या जागी जेमिमाला संधी  

मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गेल्या 3 हंगामात अंतिम फेरी गाठली होती, मात्र दुर्दैवाने त्यांना एकदाही विजेतेपद पटकावता आले नाही. आता लॅनिंगच्या जागी 25 वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जकडे संघाची सूत्रे सोपवून फ्रँचायझीने भविष्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावापूर्वी जेमिमाला 2.2 कोटी देऊन आपल्या संघात कायम ठेवले होते.

हेही वाचा – T20 Cricket New World Record: क्रिकेट विश्वात खळबळ! एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स; इंडोनेशियाच्या गोलंदाजाचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'

जेमिमाचा आतापर्यंतचा प्रवास

जेमिमाने 2025 च्या विश्वचषक विजयात भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने केलेली 127 धावांची ऐतिहासिक खेळी क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत. अवघ्या 25 व्या वर्षी जेमिमाकडे 113 T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दांडगा अनुभव असून तिने यात 2,444 धावा केल्या आहेत. ती पहिल्या हंगामापासून दिल्लीचा अविभाज्य भाग आहे. तिने 27 सामन्यांत 139.67 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा कुटल्या आहेत.

हेही वाचा – England Ashes Series 2025 : रिसॉर्टमध्ये रात्र घालवल्या, खूप मद्यपान केलं…; मालिका पराभवानंतर इंग्लंड संघाच्या व्यवस्थापकाने केला मोठा खुलासा

हा माझ्यासाठी मोठा सन्मान – जेमिमा रॉड्रिग्ज

कर्णधार म्हणून निवड झाल्यावर जेमिमा म्हणाली, 'दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी संघ मालक आणि सपोर्ट स्टाफची आभारी आहे. माझ्यासाठी हे वर्ष स्वप्नवत राहिले आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर आता मला मोठी जबाबदारी मिळाली आहे.' 

10 जानेवारीला पहिला सामना

जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ WPL 2026 चा पहिला सामना 10 जानेवारी रोजी बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. नव्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्रथमच विजेतेपदावर नाव कोरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number