Cyclone Ditwah Death Toll in Shrilanka is 56 : बंगालच्या उपसागरातून (Bay of Bengal) तयार झालेले ‘दितवाह’ (Ditwah) चक्रीवादळ वेगाने भारताकडे सरकत आहे, परंतु या वादळाने श्रीलंकेत मोठे नुकसान केले आहे. श्रीलंकेत पूर (Floods) आणि भूस्खलनामुळे (Landslides) आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झाला असून, 21 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान अत्यंत खराब झाल्यामुळे श्रीलंकेच्या सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता आज (शुक्रवारी) सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली.
भारतात 30 नोव्हेंबरला वादळ पोहोचण्याची शक्यता
हे शक्तिशाली वादळ आता भारताच्या किनारपट्टीकडे जलद गतीने पुढे जात आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा (Ditwah Cyclone Alerts) जारी करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला या राज्यांच्या किनारी भागात हे चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘X’ वर पोस्ट करून, प्रभावित कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्वरित पुनर्वसनासाठी प्रार्थना केली आहे.
My heartfelt condolences to the people of Sri Lanka who have lost their loved ones due to Cyclone Ditwah. I pray for the safety, comfort and swift recovery of all affected families. In solidarity with our closest maritime neighbour, India has urgently dispatched relief… — Narendra Modi (@narendramodi) November 28, 2025
भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत मदत; श्रीलंकेत मदतकार्य सुरू
भारताने आपला जवळचा सागरी शेजारी असलेल्या श्रीलंकेच्या मदतीसाठी तातडीने ‘ऑपरेशन सागर बंधू’ (Operation Sagar Bandhu) सुरू केले आहे. या अंतर्गत, मानवतावादी सहाय्यता आणि आपत्कालीन मदत (HADR) सामग्री पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी, परिस्थिती जसजशी बदलेल तसतशी अधिक मदत पुरवण्यासाठी भारत तयार असल्याचे आश्वासन दिले आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच किनारी भागातील रहिवाशांना घरीच थांबण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Cyclonic Storm DITWAH Alert ⚠️ North Tamil Nadu, Puducherry, and the beaches of South Andhra Pradesh are under cyclone watch as Cyclonic Storm DITWAH moves north-northwest across Sri Lanka and the southwest Bay of Bengal. The system is expected to cross near the coast by early… pic.twitter.com/xf1shIkeed — India Meteorological Department (@Indiametdept) November 28, 2025
स्टालिन यांनी 14 जिल्ह्यांच्या तयारीचा घेतला आढावा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. 29 आणि 30 नोव्हेंबरला डेल्टा जिल्हे आणि दक्षिणेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी 14 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून खबरदारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आणि आवश्यक निर्देश दिले. चक्रीवादळाचा फटका बसणाऱ्या भागात मदत छावण्या (Relief Camps) उभारल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
#CycloneDitwah பாதிப்புகளில் இருந்து மக்களைக் காக்க 14 மாவட்ட ஆட்சியர்களுடன் முன்னெச்சரிக்கை நடவடிக்கைகள் குறித்து ஆலோசனை மேற்கொண்டு அறிவுறுத்தல்களை வழங்கியிருக்கிறேன். 16 #SDRF படைகளும் 12 #NDRF படைகளும் கடுமையான மழைப்பொழிவு ஏற்படக்கூடிய மாவட்டங்களுக்கு அனுப்பி… pic.twitter.com/rIyhxAbehj — M.K.Stalin – தமிழ்நாட்டை தலைகுனிய விடமாட்டேன் (@mkstalin) November 28, 2025
राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात
या वादळाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद पथके (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथके (NDRF) तैनात करण्यात आली आहेत. स्टालिन यांच्या माहितीनुसार, 16 SDRF आणि 12 NDRF पथके जोरदार पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (शुक्रवारी) तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, तामिळनाडूतील थुथुकुडीसह अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
हेही वाचा – Hong Kong Fire Tragedy: मानवनिर्मित आपत्ती? हॉंगकॉंग आगीत 94 मृत, रहिवाशांचे गंभीर आरोप