Curd And Buttermilk Benefits: दही की ताक? पावसाळ्यात आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

पावसाळ्यात हवामान कधी उकाड्याचे तर कधी गारठ्याचे होते. अशा वेळी प्रश्न पडतो की, पावसाळ्यात नेमकी दह्याचे सेवन करावे की, ताकाचे? चला तर आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत.<br/>

Curd And Buttermilk Benefits: दही की ताक? पावसाळ्यात आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Curd And Buttermilk Benefits: उन्हाळ्यात दही आणि ताक या दोन्ही पेयांची मागणी झपाट्याने वाढते. दही आणि ताक उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा देतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हा त्यांचा मुख्य फायदा आहे. पण उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात हवामान कधी उकाड्याचे तर कधी गारठ्याचे होते. अशा वेळी प्रश्न पडतो की, पावसाळ्यात नेमकी दह्याचे सेवन करावे की, ताकाचे? चला तर आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत.

आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींच्या दृष्टीने दही फायदेशीर मानले गेले आहे. नैसर्गिक बॅक्टेरियामुळे तयार होणाऱ्या दह्यात लॅक्टोबॅसिलससारखे प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात आणि हानिकारक जिवाणू कमी करतात. त्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. तसेच दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होतात आणि स्नायूंचा विकास होतो. नियमित दही सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आतड्यांचा दाह कमी होतो. मात्र बाजारातील गोड दही टाळावे, कारण त्यातील जास्त साखर आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

हेही वाचा – Child Nutrition Guidance for Parents : वयानुसार मुलांचा आहार कसा असावा? बाळापासून ते 18 वर्षांपर्यंत.. जाणून घ्या

दरम्यान, पावसाळ्यात मात्र दह्याचा थंड स्वभाव आणि कफवर्धक गुणधर्म काहींसाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच या ऋतूमध्ये ताक अधिक फायदेशीर मानले जाते. दह्यात पाणी मिसळून घूसळून बनवलेले ताक हलके, कमी चरबीयुक्त आणि कमी कॅलरीचे असते. त्यात असलेले लॅक्टिक अॅसिड पचन सुधारते, पोटातील जळजळ कमी करते. 

हेही वाचा – Diet For Kidney Health: किडनी निकामी होण्याचा धोका टाळायचाय? 'या' 5 पदार्थांचा आहारात करा समावेश

ताकात इलेक्ट्रोलाइट्स असल्याने शरीरातील पाणी व खनिजांचे संतुलन राखले जाते आणि शरीर हायड्रेट राहते. एका अभ्यासानुसार, ताक शरीराचे तापमान संतुलित ठेवते, थकवा कमी करते आणि पावसाळ्यात पचन सुलभ करते. एकूणच, दही आणि ताक दोन्हीही आरोग्यासाठी उपयुक्त असले तरी पावसाळ्यात पोटाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी ताकाचा पर्याय अधिक योग्य ठरतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number