ICC Prize Money: यंदाच्या विश्वचषकामध्ये सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघावर आता पैशांचा पाऊस पडत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. या विजयानंतर बीसीसीआयने (BCCI) 131 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होतेच, मात्र आता आयसीसीने (ICC) देखील अधिकृत बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने एकूण 1 अब्ज रुपयांपेक्षा जास्त (अंदाजे 103.46 कोटी रुपये) रकमेचा 'प्राइज मनी' ठेवले होते.
विजेत्या भारताला मिळाले सर्वाधिक 24 कोटी
विश्वविजेत्या टीम इंडियाला आयसीसीकडून सर्वाधिक 24.28 कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा आणि सलग दोनदा जेतेपद पटकावणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. दुसरीकडे, अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या उपविजेत्या न्यूझीलंडच्या वाट्याला 13.09 कोटी रुपये आले आहेत. उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 9.25 कोटी तर इंग्लंडला 8.96 कोटी रुपये मिळाले आहेत.
पाकिस्तान आणि इतर संघांची स्थिती
पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत 'Super 8' च्या पुढे जाऊ शकला नाही, त्यामुळे त्यांना पहिल्या पाच संघांमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तानला केवळ 4.81 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. वेस्ट इंडिजला 4.95 कोटी, तर झिम्बाब्वेला 4.52 कोटी रुपये मिळाले आहेत. या स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला प्रत्येकी 2.85 कोटी रुपये मिळाले आहेत. कॅनडा, ओमान आणि नामिबिया यांसारखे संघ गट टप्प्यातच बाहेर पडल्याने त्यांना सर्वात कमी रक्कम मिळाली आहे.
हेही वाचा – IPL 2026 Schedule Update: IPL वर युद्धाचे सावट! गॅस टंचाईमुळे स्पर्धा रद्द होणार? मोठी अपडेट समोर
आयसीसीने जाहीर केलेली आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
भारत- 24.28 कोटी
न्यूझीलंड- 13.09 कोटी
दक्षिण आफ्रिका- 9.25 कोटी
इंग्लंड- 8.96 कोटी
वेस्ट इंडिज- 4.95 कोटी
पाकिस्तान- 4.81 कोटी
श्रीलंका- 4.38 कोटी