Maharashtra Cotton Cultivation: चार वर्षांत राज्यातील कापूस लागवडीत 4.59 लाख हेक्टरची घट; काय आहे यामागचं कारण?

वाढता मजुरी खर्च, हाताने कापणीची अडचण आणि यांत्रिकीकरणाचा अभाव यामुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे, विशेषतः सोयाबीनकडे वळले आहेत.

Maharashtra Cotton Cultivation: चार वर्षांत राज्यातील कापूस लागवडीत 4.59 लाख हेक्टरची घट; काय आहे यामागचं कारण?

Maharashtra Cotton Cultivation: महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात 4.59 लाख हेक्टर इतकी लक्षणीय घट नोंदली गेली आहे. वाढता मजुरी खर्च, हाताने कापणीची अडचण आणि यांत्रिकीकरणाचा अभाव यामुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे, विशेषतः सोयाबीनकडे वळले आहेत. 2020-21 मध्ये राज्यात कापसाची लागवड 45.45 लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती. या हंगामात एकूण 101.05 लाख गाठी (प्रत्येक गाठ 170 किलो) उत्पादन झाले होते. मात्र, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि नांदेड कापूस संशोधन केंद्राच्या आकडेवारीनुसार, 2024-25 पर्यंत ही लागवड कमी होऊन 40.86 लाख हेक्टर इतकी झाली आणि उत्पादनही घटून 87.63 लाख गाठ इतके झाले. 

शेतकरी सोयाबीनकडे का वळत आहेत?

कापसाची कापणी पूर्णपणे हाताने करावी लागते आणि कापूस वेचण्याचा मजुरी खर्च प्रति किलोमागे 10 रुपयांपर्यंत जातो. कापसाची विक्री किंमत प्रति किलो 70 रुपयांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा राहत नाही. याशिवाय, पिकावर कीटकनाशके फवारण्याचा खर्चही मोठा आहे. डॉ. अरविंद पंडागळे यांच्या मते, कापूस लागवडीचा एकूण खर्च वाढत असल्याने राज्यातील शेतकरी सोयाबीनसारख्या कमी खर्चाच्या पिकांकडे वळत आहेत.

यांत्रिकीकरणाचा अभावही ठरतोय मोठी अडचण

भारतामध्ये उपलब्ध कापूस वेचण्याच्या यंत्रांमुळे कापसासोबत पाने व इतर साहित्य मिसळले जातात. त्यामुळे अशा कापसाला दर कमी मिळण्याची शक्यता असते. कामगारांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, कापूस वेचण्याचे यांत्रिकीकरण केले पाहिजे. देशभरातील अनेक उद्योग अधिक कार्यक्षम कापूस वेचण्याच्या यंत्रे विकसित करण्यावर काम करत आहेत. पांडागळे यांनी स्पष्ट केले की इतर देशांमध्ये कापसाची कापणी यंत्रांद्वारे केली जाते आणि त्यांच्या रोपांची उंची 3.6 ते 4 फूटांपेक्षा जास्त नसते.  पांडागळे यांनी सांगितलं की, भारतात, रोपे सात फूट उंच वाढू शकतात. आम्ही संशोधनाद्वारे कापसाच्या रोपांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतात, शेतकरी सरळ जातीचे कापूस बियाणे वापरतात. ब्राझील आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये ते संकरित बियाणे वापरतात. सरळ जातीचा कापूस दोन ते तीन वेळा काढता येतो, जो संकरित बियाण्यांनी शक्य नाही.

हेही वाचा – Mumbai Bandra Fort Alcohol Party: धक्कादायक! मुंबईच्या वांद्रे किल्ल्यावर खुलेआम दारुपार्टी; ठाकरेंच्या नेत्याकडून व्हिडीओ शेअर

कापसाला दर मिळत नाही, अन् मजूरही मिळत नाही 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घोसला गावातील शेतकरी आबा कोल्हे यांनी सांगितलं की, यंदा मुसळधार पावसामुळे कापसाच्या बोंडांचे वजन घटले असून यंदा प्रति किलो 20 रुपये देऊनही कामगार कापूस वेचायला तयार नव्हते. कोल्हे पुढे म्हणाले, 2021-22 वगळता कापसाला चांगला भाव मिळालेला नाही. त्यामुळे 2019 च्या तुलनेत मी लागवडीचे क्षेत्र कमी केले आहे. 2019 पर्यंत ते 11 एकरवर कापूस लावत होते, पण आता ते फक्त अर्ध्या क्षेत्रात कापसाचे पिक घेतात.

हेही वाचा – Jitendra Awhad : आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली; 'गर्वाचे घर नेहमी खाली होतं', म्हणत आव्हाडांचा शेलारांवर पलटवार

देशात कापूस आयात वाढणार, निर्यात घटणार

अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील कापसाची आयात यावर्षी निर्यातीपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. 2021-22 मध्ये भारताने 21.13 लाख गाठी आयात केल्या तर 42.25 लाख गाठी निर्यात केल्या. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या COCPC समितीच्या अंदाजानुसार, 2024-25 मध्ये आयात वाढून 25 लाख गाठी होण्याची शक्यता आहे, तर निर्यात घटून 18 लाख गाठी इतकी राहू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number