Ramesh Mhatre : नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाकडून जामीन; पण ‘या’ अटींचं करावं लागणार पालन

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना आरोपींवर अत्यंत कडक अटी लादल्या आहेत. <br/>

Ramesh Mhatre : नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाकडून जामीन; पण ‘या’ अटींचं करावं लागणार पालन

Ramesh Mhatre :  डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना आरोपींवर अत्यंत कडक अटी लादल्या आहेत. 

जामिनाचा कालावधी संपेपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार असून, त्यांनी गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हात्रे आणि इतर आरोपींना राहत्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस ठाण्यात आठवड्यातून 3 दिवस हजेरी लावणे आणि आपले पासपोर्ट न्यायालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी आणि व्हीआयपी ट्रिटमेंटला नकार

उच्च न्यायालयाने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले असून आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या 7 दिवसांत प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणातील उर्वरित 3 साक्षीदारांचे जबाब येत्या मंगळवारपर्यंत नोंदवून पूर्ण करण्याचे निर्देश सरकारी पक्षाला देण्यात आले आहेत. 

हेही वाचा – Thane Local News : महिलांच्या डब्यात चक्क साप! ठाणे स्थानकावर एकच खळबळ; लोकल तब्बल 12 मिनिटे खोळंबली

सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाकडे व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजेरीची मागणी केली असता, न्यायालयाने "ही काय व्हीआयपी ट्रिटमेंट आहे का?" असा थेट सवाल करत सुनावणीची तारीख न लांबवण्याचे आदेश आरोपींच्या वकिलांना दिले. केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच रीतसर अर्ज करून व्हीसीद्वारे हजेरीची परवानगी दिली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number