Hotel Seal In Chhatrapati Sambhajinagar: दूषित तेल अन् प्रचंड अस्वच्छता… छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध उपहारगृह सील; परवाना रद्द

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध 'मे. उत्तम उपहार गृह' या नामांकित आस्थापनेवर एफडीएच्या पथकाने अचानक धाड टाकली.

Hotel Seal In Chhatrapati Sambhajinagar: दूषित तेल अन् प्रचंड अस्वच्छता… छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध उपहारगृह सील; परवाना रद्द

Hotel Seal In Chhatrapati Sambhajinagar:  राज्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे प्रमुख सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारल्यापासून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि अवैध व्यवसायांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याच धडक मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध 'मे. उत्तम उपहार गृह' या नामांकित आस्थापनेवर एफडीएच्या पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईत ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, अत्यंत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे या हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करून ते सील करण्यात आले आहे.

दूषित तेल, वनस्पती तूप आणि प्रचंड अस्वच्छता

एफडीएच्या तपासणीदरम्यान स्वयंपाकघराची झालेली दयनीय अवस्था पाहून अधिकारीही अवाक झाले. समोसे, भजी आणि इमरती-जिलेबी तळण्यासाठी वापरलेले तेल व वनस्पती तूप (डालडा) पुन्हा पुन्हा वापरले जात होते. प्रयोगशाळेच्या चाचणीत या तेलातील टीपीसी (TPC) प्रमाण मानकांपेक्षा अत्यंत घातक पातळीवर आढळले. एवढेच नव्हे तर इडलीचे पीठ ड्रेनेज लाईनजवळ उघड्यावर ठेवण्यात आले होते. खाद्यपदार्थांमध्ये घातक कृत्रिम रंगांचा वापर, अस्वच्छ कचरापेट्या, स्वयंपाकघरात झुरळांचा वावर आणि भिंतींवर थुंकल्याचे डाग अशा किळसवाण्या बाबी तपासणीत निष्पन्न झाल्या.

हेही वाचा – Tukaram Munde FDA On BMC : मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये एफडीएची धाड! उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कारवाई; रात्रीच कॅन्टीनला ठोकलं टाळं

नियमांचे उल्लंघन आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय चाचणीचा अभाव

हॉटेल व्यवस्थापनाने नियमांची पायमल्ली केल्याचेही या कारवाईत उघड झाले. रेस्टॉरंटचा परवाना असताना तिथे मिठाईचे व्यावसायिक उत्पादन घेतले जात होते. त्याशिवाय, 25 ते 30 कामगारांकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Fitness) नव्हते आणि कीटक नियंत्रणाचा (Pest Control) कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने आस्थापना त्वरित बंद करण्याचे आदेश दिले असून, जप्त केलेले तेल व खाद्यपदार्थांचे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number