Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात गुरुवारी थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट नोंदवली गेली. धुळ्यात किमान तापमान 8.9 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पहाटे 12–13 डिग्री सेल्सिअसचा कडाक्याचा गारठा जाणवला. राज्यातील अनेक भागांत सकाळी थंड तर दुपारी स्वच्छ हवामानाची नोंद झाली.
राज्यात सर्वत्र कोरडे आणि थंड वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 14 नोव्हेंबर रोजी मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कोरडे वातावरण कायम राहणार आहे.
प्रादेशिक तापमान (कमाल/किमान)
मुंबई: 33 डिग्री सेल्सिअस / 20 डिग्री सेल्सिअस निरभ्र आकाश
कोकण: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – कोरडी स्थिती
पुणे व पश्चिम महाराष्ट्र: 30 डिग्री सेल्सिअस / 14डिग्री सेल्सिअस
मराठवाडा: 31डिग्री सेल्सिअस / 14डिग्री सेल्सिअस
उत्तर महाराष्ट्र (नाशिक): 29डिग्री सेल्सिअस / 12डिग्री सेल्सिअस
विदर्भ: 28 डिग्री सेल्सिअस / 13डिग्री सेल्सिअस
थंडीची लाट कायम; आयएमडीची चेतावणी
हवामान तज्ज्ञांनी थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांना विशेषत: पहाटे व रात्री बाहेर पडताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, तापमानात झालेल्या या घटेमुळे तूरसह इतर पिकांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा आयएमडीने दिला असून शेतकऱ्यांना थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे सुचवले आहे.