CM Fadnavis : इंधन आणि खतांच्या टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

इंधन टंचाईच्या भीतीचा गैरफायदा घेऊन जर कोणताही पेट्रोल पंप चालक काळाबाजार किंवा चढ्या दराने विक्री करत असेल, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

CM Fadnavis : इंधन आणि खतांच्या टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

CM Devendra Fadnavis on Petrol Diesel Shortage Rumors in Maharashtra : राज्यभरात इंधन टंचाईच्या अफवांमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या, ज्यामुळे अनेक शहरांत पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले असून घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पुरेशा इंधन साठ्याची खात्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, देशाकडे आणि राज्याकडे दर महिन्याला लागणारा पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. “मागणी आणि पुरवठा या साखळीवर जेव्हा ताण येतो, तेव्हा अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र, सध्या आपल्याकडे स्टॉकची कोणतीही कमतरता नाही,” असे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी अनावश्यकरीत्या पंपांवर गर्दी करून ‘पॅनिक बायिंग’ (Panic Buying) करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

काळाबाजार करणाऱ्यांना कडक इशारा
इंधन टंचाईच्या भीतीचा गैरफायदा घेऊन जर कोणताही पेट्रोल पंप चालक काळाबाजार करण्याचा किंवा चढ्या दराने विक्री करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेला यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सामान्य जनतेची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

हेही वाचा – India Fuel Production : इंधन टंचाईवर मात करण्यासाठी ONGC चा मास्टरस्ट्रोक! खोल समुद्रात तेल शोधण्यासाठी 20 अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा

अशाच प्रकारची स्थिती खतांच्या बाबतीतही
ज्या पद्धतीने इंधन संपण्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत, त्याच प्रमाणे खतांचा तुटवडा असल्याच्या अफवाही पसरवल्या जात आहेत. मात्र, खताचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणीही खतांविषयी अफवा पसरवून खतांची साठेबाजी करून शेतकऱ्यांना चढ्या दरात विक्री करताना दिसला, तर त्याच्यावरही फौजदारी कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही आणि लूट करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावरील अफवा आणि वास्तव
मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह अनेक भागांत पेट्रोल संपणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. अशाच अफवा खतांच्या बाबतीतही पसरल्या आहेत. ट्विटर (X) आणि व्हॉट्सॲपवर काही व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात रशियाकडून कच्चे तेल आणि देशांतर्गत रिफायनरीमधून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केवळ अफवांमुळे मागणीत अचानक 30 टक्के ते 40 टक्के वाढ झाल्याने काही पंपांवर तात्पुरता साठा संपल्याचे चित्र निर्माण झाले होते.

नागरिकांना शांततेचे आवाहन
कोल्हापूर आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच इंधन विक्रीवर मर्यादा घातल्या आहेत, जेणेकरून साठवणूक रोखता येईल. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, राज्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि इंधनाचा पुरवठा विसकळीत होणार नाही. तेव्हा वेळ वाया घालवू नका. तसेच, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून असून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

हेही वाचा – Kolhapur News : कोल्हापूरकरांनो, लक्ष द्या! पेट्रोल-डिझेल खरेदीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध; दुचाकी आणि चारचाकीला ‘इतकी’ मर्यादा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number