CM Devendra Fadnavis : राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत; इतक्या दिवसांत पैसे खात्यात जमा होणार

पूरग्रस्तांना मदत जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, राज्याकडून दिली जाणारी मदत तातडीने देण्यात येईल.

CM Devendra Fadnavis : राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत; इतक्या दिवसांत पैसे खात्यात जमा होणार

मुंबई: राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर आज मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत पुढील 8 ते 10 दिवसांत थेट 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यभर पाहणी दौरा आणि तातडीची मदत
मंत्र्यांचे दौरे : मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांना उद्यापासूनच राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ते स्वतःही लवकरच पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार : अतिवृष्टीमुळे ज्या कुटुंबांतील व्यक्तींचा मृत्यू झाला, घरे उद्ध्वस्त झाली किंवा जनावरे दगावली आहेत, अशांना तातडीची मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पावसाची स्थिती : राज्यात सरासरीच्या 102 टक्के म्हणजेच 975 मिलीमिटर पाऊस झाला असून, यामुळे 30 जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव आणि बीडमध्ये बचावकार्य सुरू आहे.

हेही वाचा – Solapur Heavy Rain: मुसळधार पावसामुळे सोलापुरात गंभीर पूरस्थिती, 26 गावांचा संपर्क तुटला; प्रशासन अॅक्शन मोडवर

केंद्र सरकारची मदत आणि राजकारण
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, ही मदत येण्यासाठी वेळ लागू शकतो. तेव्हा, राज्याकडून देण्यात येणारी मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवताना केंद्राची मदत येईपर्यंत वाट पाहणार नाही. राज्य सरकारने जाहीर केलेली 2,215 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने दिली जाईल.

यावेळी, त्यांनी काही राजकीय पक्षांनी केलेल्या राजकारणावरही टीका केली. “काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असते, पण आम्ही त्यावर लक्ष देणार नाही. आम्हाला शक्य तितकी मदत आम्ही करू आणि केंद्र सरकारचीही मदत घेऊ,” असे ते म्हणाले.

विस्थापित नागरिकांची सोय
पुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. पाणी ओसरल्यानंतर आणि साफसफाई झाल्यावर त्यांना त्यांच्या घरी परत पाठवले जाईल. या अतिवृष्टीमुळे राज्यात 8 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जनावरेही दगावली आहेत.

हेही वाचा – Woman Rescue: सोलापूरमध्ये सीना नदीत पडलेल्या महिलेचे धाडसी तरुणांनी वाचवले प्राण; पहा व्हायरल व्हिडिओ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number