Abhijeet Dipke Marriage: जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दीपकेच्या लग्नाची चर्चा; डिसेंबर-जानेवारीत…

अभिजीतच्या आईने सांगितले की, लग्नासाठी स्थळे येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, आता तो ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यानुसार त्याला..

Abhijeet Dipke Marriage: जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दीपकेच्या लग्नाची चर्चा; डिसेंबर-जानेवारीत…

Abhijeet Dipke Marriage Rumors: दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) पेपरफुटीविरोधात 1 महिन्याहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर 30 वर्षांचे अभिजीत दिपके आता एक प्रमुख तरुण नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने आंदोलन यशस्वीरीत्या संपल्यानंतर आता दिपके यांच्या वैयक्तिक आयुष्याची, विशेषतः त्यांच्या लग्नाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीत त्यांच्या आई-वडिलांनी सांगितले की, आंदोलनाच्या यशानंतर अभिजीतसाठी लग्नाची अनेक नवी स्थळे येऊ लागली आहेत. 'आमची इच्छा तर त्याने उद्याच लग्न करावे अशी आहे, परंतु डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात त्याचा विवाह पार पाडावा,' अशी भावना त्याच्या आईने व्यक्त केली.

अमेरिकेत MSc करत असतानापासूनच लग्नासाठी विचारणा
अभिजीतच्या आईने त्याच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देत सांगितले की, लग्नासाठी स्थळे येण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो जेव्हा अमेरिकेत MScचे शिक्षण घेत होता, तेव्हाही अनेक नातेवाईकांकडून लग्नाबाबत सतत विचारणा केली जात होती. मात्र, त्यावेळी शिक्षण पूर्ण करण्याला अभिजीतचे प्राधान्य होते, त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्नाचा विचार करू, असे त्याने घरच्यांना स्पष्ट केले होते. आता आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या चर्चांनी वेग घेतला आहे.

हेही वाचा – CJP Protest : भाजपशासित राज्यांत पुन्हा तेच? CJP च्या नव्या पोस्टमुळे चिंता वाढली; जे. पी. नड्डांना करून दिली आश्वासनाची आठवण

'सून कशी हवी?'; आईने स्पष्ट केली आपली भूमिका
सून कशी असावी या प्रश्नावर बोलताना अभिजीतच्या आईने अत्यंत मोकळेपणाने विचार मांडले. 'सुरुवातीला मला वाटायचे की सून साधी आणि कौटुंबिक असावी. परंतु आता अभिजीत ज्या सामाजिक आणि राजकीय टप्प्यावर पोहोचला आहे, ते पाहता त्याला त्याची जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे,' असे त्या म्हणाल्या. आजच्या तरुण पिढीची विचारसरणी वेगळी आहे आणि परिस्थिती आता बदलली आहे; त्यामुळे अभिजीत जो काही निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

अभिजीत दिपके आणि CJP च्या प्रवासाची थोडक्यात पार्श्वभूमी
अभिजीत दिपके हे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीनंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पेज सुरू केले होते, ज्याचे फॉलोअर्स अल्पावधीतच भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्या राजकीय पक्षांपेक्षाही अधिक झाले. त्यानंतर त्यांनी NEET पेपरफुटीचा मुद्दा आणि त्यामुळे निराश होऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आक्रमकपणे लावून धरला. या मुद्द्यावर त्यांनी जंतर-मंतरवर भव्य आंदोलनाचे आवाहन केले होते, ज्यामध्ये सोनम वांगचुक आंदोलनाचा मुख्य चेहरा बनले आणि त्यांनी 26 दिवस उपोषण केले.

हेही वाचा – Sonam Wangchuk Discharge: डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक सर्वात आधी कुठे गेले? लडाखला जाण्यापूर्वी घेतला मोठा निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number