गेले बरेच दिवस राजकीय वर्तुळातील सत्तासंघर्षाने संपूर्ण राज्यभरात चांगलीच खळबळ माजवली होती. ११ मे रोजी यावर सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस निर्णय दिला. परंतु, त्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. तर, ‘उद्धवा अजब तुझा कारभार’ असं म्हणत भाजपा नेता चित्रा वाघ यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजपा गटावर टीका केल्या. यासोबतच अनेकांवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यपाल यांच्यावरही टीकास्त्र सोडले. या पार्श्ववभूमीवर ‘उद्धवा, अजब तुझा कारभार! जे पक्षप्रमुखपदी बेकायदा ठरले, तेच राज्यपाल नियुक्तीवर ज्ञान पाजळतायत.’ असं म्हणत भाजपा नेता चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.