ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात बदल; भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर

बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महिला क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेक मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले.

ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात बदल; भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर

ICC Champions Trophy: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक 31 मे रोजी अहमदाबाद येथे पार पडली. बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महिला क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेक मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2027 मध्ये होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'महिला चॅम्पियन्स ट्रॉफी'च्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. मूळ नियोजनानुसार ही स्पर्धा जून-जुलै महिन्यात खेळवली जाणार होती. मात्र आयसीसी बोर्डाने यात सुधारणा करत ही स्पर्धा आता फेब्रुवारी महिन्यातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जून-जुलैऐवजी आता फेब्रुवारीमध्ये रंगणार 'महिला चॅम्पियन्स ट्रॉफी'  
पुरुष क्रिकेटच्या धर्तीवर आता महिला क्रिकेटमध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीचे पदार्पण होत आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल 8 संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील. आयसीसीने आधी यासाठी जून-जुलै 2027 हा काळ निश्चित केला होता, परंतु अहमदाबादमधील बैठकीनंतर आता ही स्पर्धा 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत खेळवली जाईल, म्हणजेच स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा आधी होणार आहे. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पुरुषांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही 50 षटकांची (ODI) असते, तर महिलांची ही चॅम्पियन्स ट्रॉफी T20 स्वरूपात खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत ICC चा मोठा निर्णय 
याच बैठकीत 2028 मध्ये होणाऱ्या 'महिला T20 विश्वचषका'बाबतही आयसीसीने एक मोठी घोषणा केली. या विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव पाहता, भारतीय महिला क्रिकेट संघ आपले सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही, यावर आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. भारताचे सर्व सामने पाकिस्तानऐवजी एखाद्या 'तटस्थ ठिकाणी' खेळवले जातील. यापूर्वी भारतीय पुरुष संघानेही 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता, तर पाकिस्तानी संघानेही गेल्या वर्षीच्या महिला वनडे विश्वचषकासाठी किंवा या वर्षीच्या पुरुष T20 विश्वचषकासाठी भारताचा दौरा केला नव्हता.

हेही वाचा – Membership Suspended: क्रिकेट विश्वाला मोठा धक्का! T20 विश्वचषकात खेळलेल्या 'या' देशाचे सदस्यत्व ICC कडून रद्द

10 संघ घेणार भाग
महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय करण्यासाठी आणि नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी आयसीसीने 'महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन स्पर्धासुद्धा T20 स्वरूपात खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. या 10 संघांपैकी 5 संघ आयसीसीचे 'पूर्ण सदस्य' देश असतील, तर उर्वरित 5 संघ 'सहयोगी सदस्य' देशांचे असतील. या स्पर्धेचे नेमके वेळापत्रक आणि ठिकाण आयसीसी आगामी काळात जाहीर करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number