Summer Special Trains : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-पुणे ते नागपूरदरम्यान 6 विशेष गाड्या; जळगाव, भुसावळसह या स्थानकांवर थांबा

मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांना जोडणाऱ्या 6 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील गर्दीचा अतिरिक्त भार कमी होण्यासह प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Summer Special Trains : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-पुणे ते नागपूरदरम्यान 6 विशेष गाड्या; जळगाव, भुसावळसह या स्थानकांवर थांबा

Central Railway Summer Special Trains 2026 : उन्हाळी गर्दीसाठी रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. लग्नसराईचा हंगाम, उन्हाळी सुट्ट्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांना जोडणाऱ्या 6 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील प्रवाशांचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून सुरू झाले असून प्रवासी ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरून किंवा आरक्षण केंद्रांवरून आपली तिकिटे बुक करू शकतात.

मुंबई–नागपूर विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर दरम्यान एकूण 4 विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांचा तपशील असा आहे –

– गाडी क्रमांक 01021: ही गाडी 1 आणि 3 May रोजी मुंबईहून पहाटे 0.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.45 वाजता नागपूरला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01022: परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नागपूरहून रात्री 9.40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता मुंबईत दाखल होईल.

– प्रमुख थांबे : या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

हेही वाचा – Weather Update : महाराष्ट्र ‘हिट वेव्ह’नं हैराण, तरीही काही जिल्ह्यांवर वादळी वाऱ्याचं संकट

पुणे–नागपूर मार्गावरही नवीन सेवा
पुणे आणि नागपूर दरम्यान देखील 2 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील संपर्क अधिक सुलभ होईल.

– गाडी क्रमांक 01467: ही गाडी 1 May रोजी पुण्याहून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.05 वाजता नागपूरला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01468: परतीसाठी ही गाडी 3 May रोजी नागपूरहून सकाळी 7.00 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुण्यात पोहोचेल.

– प्रमुख थांबे : या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, भुसावळ आणि धामणगाव यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी सोयीसुविधा आणि कोच रचना
प्रवाशांच्या विविध गरजांचा विचार करून या गाड्यांची रचना करण्यात आली आहे. मुंबई-नागपूर विशेष गाडीत 16 स्लीपर कोच आणि 1 एसी तृतीय श्रेणीचा डबा असेल. तर पुणे-नागपूर गाडीत 1 एसी द्वितीय श्रेणी, 1 एसी तृतीय श्रेणी आणि 12 शयनयान (स्लीपर) डब्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनारक्षित डब्यांसाठी ‘यूटीएस’ (UTS) प्रणालीद्वारे किंवा ‘रेलवन’ ॲपवरून सामान्य दरात तिकिटे उपलब्ध असतील. विशेष गाड्यांसाठी रेल्वेच्या नियमांनुसार अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे, तरीही प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा – Pre-Monsoon 2026: उकाड्यापासून होणार सुटका! IMD कडून 29 राज्यांसाठी वादळ अन् मान्सूनपूर्व पावसाचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number