Central Railway Block : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना 3 दिवस ‘ब्लॉक’चा झटका; गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल

विद्याविहार रेल्वे स्थानकावर नवीन मध्यवर्ती पादचारी पुलाचा (FOB) गर्डर बसवण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने 'ब्लॉक'चा निर्णय घेतला आहे.

Central Railway Block : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना 3 दिवस ‘ब्लॉक’चा झटका; गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल

Central Railway Block : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकावर नवीन मध्यवर्ती पादचारी पुलाचा (FOB) गर्डर बसवण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने 15 मे ते 18 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा ब्लॉक जाहीर केला आहे. गर्डर बसवण्याचे हे काम एकूण 3 टप्प्यांत पार पडणार असून, यामुळे मुंबईकरांच्या प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ब्लॉकची वेळ आणि रेल्वे मार्गांतील बदल
हा विशेष ब्लॉक रात्रीच्या वेळी घेण्यात येणार आहे. यामध्ये शुक्रवार, 15 मे च्या मध्यरात्री 1.15 ते पहाटे 4.15 पर्यंत पहिली वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवार, 16 मे रोजी रात्री 12.10 ते पहाटे 4.40 पर्यंत आणि रविवार, 17 मे च्या मध्यरात्री 1.15 ते पहाटे 3.05 पर्यंत ब्लॉकचे सत्र सुरू राहील. या कालावधीत कुर्ला ते भांडुप दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. CSMT वरून रात्री 11.30 ते 12.12 या वेळेत कर्जतकडे जाणाऱ्या धिम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा – Dombivli Building Demolition: डोंबिवलीत 35 वर्षांपूर्वीच्या इमारतीवर चालणार हातोडा; KDMC च्या एका निर्णयामुळे 29 कुटुंबे ऐन पावसाळ्यात रस्त्यावर

काही लोकल फेऱ्या रद्द, तर काहींचा प्रवास मर्यादित
ब्लॉकमुळे काही महत्त्वाच्या लोकल फेऱ्या प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे येथून रात्री 11.40 ला सुटणारी ठाणे-कुर्ला लोकल आणि पहाटे 4.04 ची ठाणे-CSMT लोकल यांचा समावेश आहे. तसेच CSMT वरून रात्री 11.38 आणि 12.24 वाजता सुटणाऱ्या ठाणे लोकलदेखील धावणार नाहीत. कसारा बाजूकडून रात्री 10 वाजल्यानंतर CSMT कडे येणाऱ्या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्यांचा प्रवास कुर्ला किंवा ठाणे स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे.

प्रवाशांमध्ये संताप
मध्य रेल्वेची सेवा आधीच विलंबाने चालत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत, त्यातच आता सलग 3 दिवस रात्रीच्या वेळी ब्लॉक घेतल्यामुळे नोकरदार आणि रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत. विशेषतः कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना या बदलांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. रेल्वेने पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी हे पाऊल उचलले असले, तरी सलगच्या या ब्लॉकमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Thane Municipal Corporation: ठाकरे गटाच्या खेळीने शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांची खुर्ची धोक्यात? दिव्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय? वाचा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number