Special Trains : ख्रिसमस-सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेचे खास नियोजन; मुंबई-पुण्यातून धावणाऱ्या 14 विशेष ट्रेन्सची यादी जाहीर

मध्य रेल्वेने विविध सण आणि हिवाळी सुट्ट्यांसाठी 'ऑन डिमांड' 14 विशेष ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्यांनी लोक विविध ठिकाणी जलद आणि आरामदायी प्रवास करू शकतील.

Special Trains : ख्रिसमस-सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेचे खास नियोजन; मुंबई-पुण्यातून धावणाऱ्या 14 विशेष ट्रेन्सची यादी जाहीर

Special Trains for Winter Holidays : ख्रिसमस (Christmas), हिवाळी सुट्ट्या (Winter Vacations) आणि वर्षाअखेरीस (Year-end) होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने अतिरिक्त रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 विशेष गाड्यांचे (Special Trains) नियोजन केले आहे.

मुंबई आणि पुण्यातून विशेष सेवा
या सर्व 14 विशेष गाड्या महाराष्ट्रातील (Maharashtra Trains) मुंबई आणि पुणे (Mumbai and Pune Trains) या महत्त्वाच्या शहरांतून धावणार आहेत. या विशेष गाड्यांमध्ये सर्व वर्गांचा समावेश असेल. यात प्रथम वातानुकूलित, वातानुकूलित द्वितीय, वातानुकूलित तृतीय, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचा समावेश आहे, जेणेकरून सर्व विभागांतील प्रवाशांना सेवा मिळू शकेल.

या प्रमुख स्थळांसाठी धावणार गाड्या
मध्य रेल्वेने विविध सण आणि हिवाळी सुट्ट्यांसाठी 'ऑन डिमांड' (On Demand Trains) 14 विशेष ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्यांनी लोक विविध ठिकाणी जलद आणि आरामदायी प्रवास करू शकतील. या विशेष गाड्यांमध्ये मडगाव, नागपूर, बेंगळूरु, लखनौ , गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या विविध महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.

हेही वाचा – Dahisar-Bhayander Link Road: वाहतूक कोंडी फुटणार, दहिसर ते भाईंदर प्रवास आता फक्त पाच मिनिटांचा; जाणून घ्या प्रशासनाचा नवा प्रकल्प

मुंबईतून धावणाऱ्या प्रमुख गाड्या
मुंबईतून (Mumbai Trains) धावणाऱ्या काही प्रमुख विशेष गाड्या खालीलप्रमाणे आहेत:
– लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते लखनऊ विशेष गाडी (Lucknow Special): लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी: ही गाडी 6.12.2025 रोजी 17 वाजून 15 मिनिटांनी (संध्याकाळी 5:15 वाजता) सुटेल.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर विशेष गाडी: ही गाडी 7.12.2025 रोजी 15 वाजून 30 मिनिटांनी (दुपारी 3:30 वाजता) सुटेल.
– लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी: ही गाडी 7.12.2025 रोजी 11 वाजून 10 मिनिटांनी सुटेल.
– लोकमान्य टिळक टर्मिनस ते हैदराबाद विशेष गाडी: ही गाडी 7.12.2025 रोजी 17 वाजून 20 मिनिटांनी (संध्याकाळी 5:20 वाजता) सुटेल.

पुण्यातून धावणाऱ्या प्रमुख गाड्या
पुण्यातून (Pune) देखील दोन महत्त्वाच्या विशेष गाड्या धावणार आहेत:
– पुणे ते बंगळूरु विशेष गाडी: ही गाडी 6.12.2025 रोजी पुणे येथून 19 वाजून 00 मिनिटांनी (संध्याकाळी 7:00 वाजता) सुटेल.
– पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी: ही गाडी 7.12.2025 रोजी पुणे येथून 20 वाजून 20 मिनिटांनी (रात्री 8:20 वाजता) सुटेल.
– याव्यतिरिक्त, नागपूरहून (Nagpur) 6.12.2025 रोजी 22 वाजून 10 मिनिटांनी (रात्री 10:10 वाजता) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई साठी विशेष गाडी सुटेल.

हेही वाचा – Indigo Flight Cancellation : 1000 हून अधिक उड्डाणे रद्द; सुप्रिया सुळेंची इंडिगोवर कारवाई करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number