Terror Network in Pakistan : पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा नवीन राजकीय चेहरा? ‘सेंट्रल मुस्लिम लीग’ आणि काश्मीर कनेक्शन

पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातल्या वाढत्या सीमावादात याकूब शेख सारखे कट्टरपंथी नेते पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने पुढे येत आहेत. राजकीय पक्ष म्हणून त्यांना मिळणारी मान्यता ही चिंतेची बाब आहे.

Terror Network in Pakistan : पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा नवीन राजकीय चेहरा? ‘सेंट्रल मुस्लिम लीग’ आणि काश्मीर कनेक्शन

Terror Network in Pakistan : पाकिस्तानमधील 'सेंट्रल मुस्लिम लीग' या नवीन राजकीय पक्षाच्या उदयाने आणि त्याचे नेते कारी याकूब शेख यांच्या प्रक्षोभक विधानांनी दक्षिण आशियातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आता राजकारणाच्या बुरख्याखाली पुन्हा सक्रिय होत असल्याच्या चर्चेला यामुळे उधाण आले आहे.

राजकारणाच्या नावाखाली दहशतवादी नेटवर्क?
पाकिस्तानमध्ये अलीकडेच स्थापन झालेल्या 'सेंट्रल मुस्लिम लीग' या पक्षाचे नेतृत्व कारी मुहम्मद याकूब शेख करत आहे. विशेष म्हणजे, 2012 मध्ये अमेरिकेने लश्कर-ए-तैयबा आणि जमात-उल-दावासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्यामुळे याकूब शेखला आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या यादीत टाकले होते. आता याच व्यक्तीने राजकीय पक्ष स्थापन करून जाहीर सभांमधून पाकिस्तानी सैन्याचे समर्थन सुरू केले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला इशारा देताना याकूबने म्हटले की, "तालिबानने जाहीर करावे की, पाकिस्तानच्या दिशेने एकही गोळी झाडली जाणार नाही, अन्यथा उलेमा आणि मशायख पाकिस्तानच्या रक्षणासाठी उभे ठाकतील."

अफगाणिस्तानशी असलेले जुने संबंध
लश्कर-ए-तैयबाचे कनेक्शन केवळ पाकिस्तान आणि काश्मीरपुरते मर्यादित नसून, गेल्या 20 वर्षांपासून हे नेटवर्क अफगाणिस्तानमध्येही सक्रिय आहे. अफगाणिस्तानच्या कुनार आणि नूरिस्तान यांसारख्या पूर्व भागात या संघटनेचे लढाऊ तालिबानसोबत मिळून काम करत असल्याचे समोर आले आहे. जैश अल-हदा आणि जैश अल-सलाफिया यांसारखे गट लश्करचे प्रतिनिधी म्हणून तिथे ओळखले जात होते. अफगाणिस्तानच्या माजी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, लश्करच्या अनेक सदस्यांनी तिथे विदेशी सैन्याविरुद्ध तालिबानच्या खांद्याला खांदा लावून युद्ध केले आहे.

हेही वाचा – Thailand Cambodia Dispute: भगवान विष्णूंच्या मूर्तीची विटंबना; थायलंड-कंबोडिया सीमेवरील घटनेवर भारताचा तीव्र संताप

काश्मीरमधील घातपाताचा काळा इतिहास
लश्कर-ए-तैयबाची स्थापना 1990 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह संयुक्त राष्ट्रांनीही या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. 2000 मधील लाल किल्ल्यावरील हल्ला आणि 2008 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात या संघटनेचा थेट सहभाग होता. लश्कर व्यतिरिक्त हिज्ब-उल-मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद आणि अल-बद्र यांसारख्या संघटनांचेही अफगाणिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी जुने आणि घट्ट संबंध राहिले आहेत.

तालिबान-पाकिस्तान तणावात लष्करची भूमिका
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वाढत असलेल्या सीमावादात याकूब शेख सारखे कट्टरपंथी नेते पाकिस्तानी सैन्याची ढाल म्हणून पुढे येत आहेत. अफगाणिस्तानमध्ये सध्या त्यांची ताकद मर्यादित असली तरी, राजकीय पक्ष म्हणून त्यांना मिळणारी मान्यता ही चिंतेची बाब आहे. 2001 मधील विधानसभा हल्ला आणि 2019 चा पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटना आजही याच नेटवर्कचा भाग आहेत, ज्यामुळे या संपूर्ण क्षेत्राच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा – Plane Crash Turkey : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ ! पाकिस्तान-लिबिया शस्त्र करारानंतर लष्करप्रमुखांचा संशयास्पद मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number