‘धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही ऐच्छिक’ – दिलीप वळसे-पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या मुद्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पोलीस महासंचालकांसोबत बैठक पार पडली. दरम्यान, धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, कुठल्याही कायद्यामध्ये भोंगे लावणे किंवा उतरवणे हे सरकारचे काम नसून सरकारची जबाबदारी नाही. […]

‘धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही ऐच्छिक’ – दिलीप वळसे-पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या मुद्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पोलीस महासंचालकांसोबत बैठक पार पडली. दरम्यान, धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

तसेच ते म्हणाले, कुठल्याही कायद्यामध्ये भोंगे लावणे किंवा उतरवणे हे सरकारचे काम नसून सरकारची जबाबदारी नाही. ज्यांना भोंगे लावायचे असतील त्यांनी पोलिसांची परवानगी घेत भोंगे लावावेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय त्यांना मान्य करावे लागतील, असे स्पष्टीकरणही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कायदा कोणीही हातात घेऊ नका. संघर्ष, तेढ वाढवू नका. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या दंगलीबाबत पोलिसांनी तयार राहण्याचे आदेशही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number