CBSE Board Exam 2026: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील. पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 आणि दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे 2026 दरम्यान होईल. <br/>

CBSE Board Exam 2026: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

CBSE Board Exam 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने 2026 सत्रातील 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांसाठी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षांचा कालावधी 17 फेब्रुवारी ते 15 जुलै 2026 दरम्यान असेल. दहावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील. पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 आणि दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे 2026 दरम्यान होईल. 

तथापी, बारावीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित केल्या जातील. 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र फेब्रुवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. तसेच, 10वीचे निकाल 4 एप्रिल 2026 पर्यंत आणि 12वीचे निकाल 20 मे 2026 पर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 

हेही वाचा – Professional Education Admission : व्यावसायिक शिक्षणासाठी परदेशातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्राला पसंती; पुण्यातील संस्थांमध्ये सर्वाधिक प्रवेश

सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या डेटशीटनुसार, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होतील आणि 15 जुलै 2026 दरम्यान चालतील. दहावीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होतील. अंतिम पेपर 9 मार्च रोजी तेलुगू, अरबी, पर्शियन, नेपाळी, रशियन आणि संगीत या विषयांसाठी होतील.

बारावीच्या बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होतील, ज्यात बायोटेक्नॉलॉजी, उद्योजकता आणि लघुलेखन (इंग्रजी) विषयांचा समावेश असेल. अंतिम परीक्षा 9 एप्रिल 2026 रोजी संस्कृत कोअर/मल्टीमीडिया/डेटा सायन्स विषयासाठी होईल. बोर्ड परीक्षा एकाच शिफ्टमध्ये सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत किंवा दुपारी 1:30 वाजता होतील.

हेही वाचा – Russia-Ukraine War : युद्धामुळे युक्रेनियन मुले शाळेत जाऊ शकत नाहीयेत! शिकण्यासाठी अवलंबावा लागतोय हा मार्ग

दहावीच्या परीक्षा दोन टप्प्यात पार पडणार – 

दरम्यान, सीबीएसईच्या दहावीच्या बोर्ड परीक्षा पहिल्यांदाच दोन टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. तात्पुरत्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, दहावीच्या मुख्य बोर्ड परीक्षा पहिल्या फेरीसाठी 17 फेब्रुवारी ते 9 मार्च आणि दुसऱ्या फेरीसाठी 15 मे ते 1 जून दरम्यान नियोजित आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number