Mumbai Coastal Road Car Fire: कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची वाहने सोडून धावाधाव

घटनेचा थरार एवढा मोठा होता की, बोगद्यात अडकलेल्या इतर नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःची वाहने जागच्या जागी सोडून पायीच सुरक्षित स्थळाकडे धाव घेतली.

Mumbai Coastal Road Car Fire: कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची वाहने सोडून धावाधाव

Mumbai Coastal Road Car Fire: मुंबईच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्गावरील कोस्टल रोड भुयारी मार्गात एका चालत्या चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. आगीच्या ज्वाला अत्यंत तीव्र असल्याने संपूर्ण कार काही वेळातच कोळसा झाली. घटनेचा थरार एवढा मोठा होता की, बोगद्यात अडकलेल्या इतर नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःची वाहने जागच्या जागी सोडून पायीच सुरक्षित स्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अखेर सव्वा तासानंतर कोस्टल रोड वरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 

हेही वाचा – Worli Concert Youth Death: वरळी कॉन्सर्ट मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; फॉरेन्सिक अहवालातून समोर आली मोठी माहिती

वाहतूक विस्कळीत; नरीमन पॉईंट येथील मार्ग रोखला

भुयारी मार्गाच्या आत वाहनाने पेट घेतल्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण बोगद्यात काळ्या धुराचे साम्राज्य निर्माण झाले. श्वास घेणे कठीण झाल्यामुळे बोगद्यातील वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला. अनेक चालकांनी प्रसंगावधान राखून आपली वाहने पाठीमागे फिरवली, तर काहींनी वाहने तेथेच उभी करून बाहेर पडणे पसंत केले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने नरीमन पॉईंटकडून येणारी वाहतूक पूर्णपणे रोखली असून, भुयारी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला.

वरळी, हाजी अली परिसरात वाहनांच्या रांगा 

दरम्यान, बोगद्यातील या दुर्घटनेमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. कोस्टल रोडवरील प्रवेश बंद केल्यामुळे वरळी आणि हाजी अली या मुख्य चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास टाळावा आणि इतर पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number