UPSC Results 2025: नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्राचा डंका! ऋषीकेश आलासे राज्यात प्रथम; टॉप 100 मध्ये 5 मराठी उमेदवारांची बाजी

संपूर्ण देशातून 958 उमेदवार पात्र ठरले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक गुणवंतांचा समावेश आहे.

UPSC Results 2025: नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्राचा डंका! ऋषीकेश आलासे राज्यात प्रथम; टॉप 100 मध्ये 5 मराठी उमेदवारांची बाजी

UPSC Results 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्रातील उमेदवारांनी पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. संपूर्ण देशातून 958 उमेदवार पात्र ठरले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक गुणवंतांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पहिल्या 100 क्रमांकांमध्ये राज्यातील 5 जणांनी स्थान मिळवून राज्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

महाराष्ट्राचे 'पाच' मानकरी (Top 100)
राज्यातून ऋषीकेश आलासे यांनी 61 व्या क्रमांकासह प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पहिल्या 100 मधील यशस्वी उमेदवार खालीलप्रमाणे आहेत:

ऋषीकेश आलासे (देशात 61 वा)
आकाश त्रिवेदी (देशात 73 वा)
गौरव चोपडा (देशात 83 वा)
सायली पगार (देशात 87 वा)
दिक्षा पाटकर (देशात 88 वा)

हेही वाचा – UPSC Final Result 2025: UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

यशस्वी उमेदवारांची सविस्तर यादी  
राज्यातील इतर काही प्रमुख यशस्वी उमेदवारांची नावे आणि त्यांचे क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:

100 ते 200 दरम्यान: ऋतुजा गायकवाड (106), वरुण टोकस (117), अंकिता अनिल पाटील (140), आर्यन सिरसीकर (175), कार्तिक बच्छाव (177).
200 ते 500 दरम्यान: राहुल पाटील (224), शुभम शरद बेहेरे (226), ऋषिकेश पालिमकर (283), मोहिनी जगताप (323), अभिषेक ओझार्डे (336), हर्षवर्धन पाटील (349), हर्षवर्धन तिडके (355), कुणाल अहिरराव (430), अभिषेक मगदूम (449), धनश्री अहिरे (489), मनोज पाटील (493).
500 ते 941 दरम्यान: विशाखा कदम (504), रजत वाळके (514), श्रुती चव्हाण (527), संकेत कुंभार (539), आरुषा पाटील (553), अविष्कार डेर्ले (591), भाग्यश्री नायकेले (647), अश्विनी कोळेकर (675), राजश्री देशमुख (754), अनिकेत अहिरे (941).

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number