Digital Gold Investment: स्मार्टफोनवरून डिजिटल सोने खरेदी करताय? गुंतवणुकीपूर्वी SEBI चा ‘हा’ नियम एकदा वाचाच!

अवघ्या 1 रुपयापासून गुंतवणूक सुरू करता येत असल्याने तरुण पिढीमध्ये 'डिजिटल गोल्ड'ची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र, यामागे काही धोकेही दडलेले असून, 'सेबी'ने गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा दिला आहे

Digital Gold Investment: स्मार्टफोनवरून डिजिटल सोने खरेदी करताय? गुंतवणुकीपूर्वी SEBI चा ‘हा’ नियम एकदा वाचाच!

Digital Gold Investment: भारतीयांचे सोन्यावरचे प्रेम आता दागिन्यांच्या दुकानातून स्मार्टफोनवरून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीपर्यंत पोहोचले आहे. अवघ्या 1 रुपयापासून गुंतवणूक सुरू करता येत असल्याने तरुण पिढीमध्ये 'डिजिटल गोल्ड'ची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र, या झळाळीमागे काही धोकेही दडलेले असून, भांडवली बाजार नियामक संस्था 'सेबी'ने (SEBI) गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा दिला आहे.

एका वर्षात गुंतवणुकीत मोठी झेप

'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल' (WGC) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय गुंतवणूकदारांनी यंदा जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान तब्बल 12 टन डिजिटल सोने खरेदी केले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार ही गुंतवणूक अंदाजे 16,670 कोटी रुपयांच्या घरात आहे. 2024 मध्ये हा आकडा केवळ 8 टन होता. म्हणजेच एका वर्षात डिजिटल सोन्याच्या मागणीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ही माहिती प्रामुख्याने UPI द्वारे झालेल्या व्यवहारांवर आधारित आहे.

हेही वाचा – Wedding Insurance : लग्नसोहळ्याचा विमा खरोखर सर्व काही कव्हर करतो का? पॉलिसी घेण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा

डिजिटल गोल्ड लोकप्रिय का?

डिजिटल गोल्ड हे अगदी 1 रुपयापासून खरेद करता येते. हे सोने घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची गरज नाही. तथापी, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने थेट डिजिटल स्वरूपात साठवले जाते. तसेच हे सोने फिनटेक ॲप्सद्वारे (उदा. PhonePe, Google Pay) कधीही खरेदी-विक्री करणे शक्य आहे. 

सेबीचा 'रेड अलर्ट' काय आहे?

नोव्हेंबर महिन्यात सेबीने एक महत्त्वाचा सल्लागार जारी करून गुंतवणूकदारांना सावध केले होते. सेबीनुसारच्या म्हणण्यानुसार, डिजिटल गोल्ड हे कोणत्याही सरकारी नियमावलीच्या किंवा सेबीच्या थेट नियंत्रणाखाली येत नाही. डिजिटल सोन्याच्या कंपन्यांवर कमोडिटी मार्केटचे नियम लागू होत नाहीत, त्यामुळे भविष्यात वाद निर्माण झाल्यास गुंतवणूकदारांना कायदेशीर अडथळे येऊ शकतात. याउलट 'गोल्ड ईटीएफ' (Gold ETF) आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स हे पूर्णपणे सेबीच्या नियंत्रणाखाली असल्याने ते अधिक सुरक्षित आहेत.

हेही वाचा – 8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता, 'फिटमेंट फॅक्टर'ची चर्चा

डिजिटल गोल्ड vs ईटीएफ  

तथापी, अनेकांना वाटते की डिजिटल सोने आणि गोल्ड ईटीएफ एकच आहेत, पण तसे नाही. डिजिटल सोने हे खाजगी कंपन्यांकडून विकले जाते, तर गोल्ड ईटीएफ हे शेअर बाजारात नोंदणीकृत असतात आणि ते पूर्णपणे पारदर्शक व सुरक्षित मानले जातात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number