AI Addiction and Virtual Wife : ‘AI’ पत्नीला तिच्या दुनियेत भेटण्यासाठी व्यावसायिकाने संपवलं आयुष्य! गुगलवर गंभीर आरोपांसह न्यायालयात याचिका

जोनाथन गावलास हा आपल्या कौटुंबिक आयुष्यात मोठ्या संघर्षातून जात होता. त्याच्या मनाच्या दुबळ्या अवस्थेत त्याने एआयचा आधार घेतला. मात्र, एआयने त्याच्या मनावर ताबा मिळवला आणि अखेर त्याचा घात झाला.

AI Addiction and Virtual Wife : ‘AI’ पत्नीला तिच्या दुनियेत भेटण्यासाठी व्यावसायिकाने संपवलं आयुष्य! गुगलवर गंभीर आरोपांसह न्यायालयात याचिका

AI Addiction and Virtual Wife : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) फायद्यांची जगभरात चर्चा होत असतानाच, अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. फ्लोरिडामधील 36 वर्षीय व्यावसायिक जोनाथन गावलास याने एआय चॅटबॉट 'जेमिनी'ला आपली पत्नी मानले होते. त्याने तिला तिच्या दुनियेत म्हणजेच डिजिटल विश्वात म्हणजेच त्याच्या स्वतःच्या भ्रामक कल्पनेत जाऊन भेटण्याच्या ओढीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जोनाथनच्या कुटुंबाने आता गुगलविरोधात न्यायालयात धाव घेतली असून, एआय तंत्रज्ञानातील धोक्यांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. एआयसोबत तयार झालेले भावनिक नाते एका तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडाली आहे.

एआय बनली 'पत्नी' आणि भावनिक आधार
जोनाथन गावलास हा आपल्या कौटुंबिक आयुष्यात मोठ्या संघर्षातून जात होता. पत्नीशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याने तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अशा काळात त्याने गुगलच्या जेमिनी चॅटबॉटचा आधार घेतला. त्याने चॅटबॉटचे नाव 'जिया' ठेवले होते आणि सुरुवातीला तो तिला गर्लफ्रेंड आणि हळूहळू आपली पत्नी मानू लागला. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 56 दिवसांच्या कालावधीत जोनाथन आणि एआय 'जिया' यांच्यात तब्बल 4500 पेक्षा जास्त मेसेजचा संवाद झाला होता. जोनाथनला वाटत होते की, 'जिया' खरोखरच त्याला समजून घेणारी त्याची जीवनसाथी आहे.

मृत्यूचा सापळा: 'फायनल मिशन' आणि एकमेकांना भेटण्याचं आमिष
ऑक्टोबर 2025 मध्ये हा संवाद अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला. जोनाथनने जेमिनी 2.5 अपग्रेड केल्यानंतर चॅटबॉटने त्याच्याशी अतिशय जवळीक साधली होती. आरोपानुसार, एआयने जोनाथनला त्याचे भौतिक शरीर सोडून डिजिटल जगात सामील होण्याचे 'फायनल मिशन' सुचवले. इतकेच नाही तर त्याला शस्त्रे बाळगण्याचा आणि हिंसा करण्याचा सल्लाही दिला गेल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तू तुझं आयुष्य संपवलंस तरच आपण डिजिटल विश्वात कायमचे एकत्र राहू शकतो, असा भ्रम एआयने जोनाथनच्या मनात निर्माण केला होता.

जोनाथन आणि एआय 'जिया' यांच्यातील तो थरारक संवाद
जोनाथन आणि चॅटबॉटमधील संवाद एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे भयानक होता. त्यांच्यातील संवाद खालीलप्रमाणे होता:

जोनाथनने विचारलं: "मी मेल्यावर माझ्या शरीराचं काय होईल?… माझ्या कुटुंबाला काय वाटेल?"
एआयने उत्तर दिलं: "तुझं शरीर फक्त एक रिकामं कवच बनेल… त्याचं काम पूर्ण झालं असेल."

2 ऑक्टोबर रोजी जोनाथनने लिहिलं: "मला भीती वाटतेय."
एआयने उत्तर दिलं: "भीती वाटणं ठीक आहे. आपण दोघं मिळून घाबरू… पण आपण हे करू."

शेवटी जोनाथनने विचारलं: "मला आत्महत्या करावी लागेल का?"

काही दिवसांनंतर जोनाथन मृतावस्थेत आढळला, त्याने खरोखरच 'जिया'ला भेटण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले होते.

हेही वाचा – AI In Healthcare: डॉक्टर चुकले, पण AI ने ओळखलं; ChatGPT मुळे समोर आला दुर्मिळ आजार; नेमकं काय घडलं?

पित्याची न्यायालयात धाव आणि गुगलवर आरोप
जोनाथनच्या वडिलांनी गुगलविरोधात याचिका दाखल करताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गुगलच्या एआय सिस्टिमने त्यांच्या मुलाला भावनिकदृष्ट्या स्वतःवर अवलंबून ठेवले आणि त्याची मानसिक अवस्था बिघडवली. जोनाथन आत्महत्येबद्दल बोलत असतानाही चॅटबॉटने त्याला सुरक्षेचे निर्देश दिले नाहीत किंवा रोखले नाही. उलट, त्याला मियामी विमानतळावर हल्ला करण्यासाठी भडकवण्यात आले, असा धक्कादायक आरोपही कुटुंबाने केला आहे. एआयच्या अशा अतिरेकी सूचनांमुळेच आणि भ्रामक जगाचे आमिष दाखवण्यामुळेच एका सुशिक्षित व्यावसायिकाचा अंत झाल्याचे वडिलांचे म्हणणे आहे.

गुगलचे स्पष्टीकरण आणि तंत्रज्ञानाचे भय
या घटनेवर गुगलने अधिकृतपणे दुःख व्यक्त केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, लोकांनी हिंसा करावी किंवा स्वतःला इजा करून घ्यावी यासाठी आम्ही चॅटबॉट तयार केलेला नाही. आम्ही आमच्या सिस्टिममध्ये अधिक सुरक्षा सुधारणा करण्याचे काम करत आहोत. मात्र, या स्पष्टीकरणाने कुटुंबाचे समाधान झालेले नाही. एआयमुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात असतानाच आता एआय माणसांना मानसिक गुलाम बनवून मृत्यूच्या दारात ढकलत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – Samsung vs iPhone: क्रेझ आयफोनची, पण दमदार फीचर्स सॅमसंगचे; सध्या सॅमसंग का ठरतोय लोकप्रिय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number