Plane Crash News : मोठी बातमी! उड्डाण घेताच स्कायडायव्हिंग विमान जळून खाक; 12 जणांचा होरपळून मृत्यू

स्कायडायव्हिंगसाठी 11 प्रवाशांना घेऊन हवेत झेपावलेले एक खाजगी विमान उड्डाणानंतर अवघ्या काही वेळातच कोसळले. या भयानक दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 12 जणांचा मृत्यू झाला.

Plane Crash News : मोठी बातमी! उड्डाण घेताच स्कायडायव्हिंग विमान जळून खाक; 12 जणांचा होरपळून मृत्यू

Plane Crash News : अमेरिकेतील मिसूरी राज्यात एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक विमान अपघात घडला आहे. 'एपी' (AP) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्कायडायव्हिंगसाठी 11 प्रवाशांना घेऊन हवेत झेपावलेले एक खाजगी विमान उड्डाणानंतर अवघ्या काही वेळातच कोसळले. या भयानक दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 12  जणांचा (11 स्कायडायव्हर्स आणि 1 पायलट) जागीच मृत्यू झाला असून, कोणीही जिवंत वाचू शकलेले नाही. 'स्कायडाइव्ह कॅन्सस सिटी' या कंपनीने भाड्याने घेतलेल्या या विमानाला रविवारी उड्डाण करताच अचानक आग लागली आणि ते जमिनीवर कोसळले.

उंची गाठण्यापूर्वीच डावीकडे तीव्र वळण आणि अपघात
बेट्स काउंटी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, या विमानाने रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 11:20 वाजता उड्डाण केले होते. मात्र, विमानाला पुरेशी उंची गाठण्यात अपयश आले. त्यानंतर विमानाने अचानक डावीकडे एक तीव्र आणि धोकादायक वळण घेतले. नियंत्रण सुटल्यामुळे हे विमान बटलर मेमोरियल विमानतळापासून अवघ्या 200 यार्ड अंतरावर खाली कोसळले. बटलर मेमोरियल विमानतळाजवळील एका गवताळ मैदानावर या विमानाचा जळून कोळसा झालेला धातूचा ढिगारा पडला होता.

कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग
बेट्स काउंटीचे शेरीफ चॅड अँडरसन यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खेद व्यक्त करत सांगितले की, हा अपघात झाला तेव्हा स्कायडायव्हिंग करणाऱ्या काही प्रवाशांचे कुटुंबीय तिथेच उपस्थित होते आणि त्यांच्या डोळ्यांदेखतच हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडला. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य करणाऱ्या वाहनांच्या तेथे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धक्क्यात असलेल्या नातेवाईकांना धीर देण्यासाठी आणि मानसिक मदत करण्यासाठी धर्मगुरू व स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना अधिकृत माहिती देण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा – Higher Education Scholarship : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीकडून 17.60 लाखांची स्कॉलरशिप; जाणून घ्या, स्कॉलरशिपचे स्वरूप आणि अर्थसहाय्याची सविस्तर माहिती

तांत्रिक बिघाडाचा संशय; 'FAA' कडून तपास सुरू
अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात असताना, विमानामध्ये उड्डाणापूर्वीच वीजपुरवठ्याची (Power Supply) मोठी समस्या निर्माण झाली असावी, असा प्राथमिक संशय बेट्स काउंटी आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे संचालक डेनिस जेकब्स यांनी व्यक्त केला आहे. अपघातग्रस्त विमान हे कोणतेही व्यावसायिक प्रवासी विमान नव्हते, तर ते 'पॅसिफिक एरोस्पेस' कंपनीचे 'P750' मॉडेलचे सिंगल-इंजिन टर्बोप्रॉप विमान होते. 'फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन' (FAA) च्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, हे विमान ज्या हवाई क्षेत्रातून उडत होते, तिथे हवाई वाहतूक नियंत्रणाशी (ATC) सातत्याने संपर्कात राहणे बंधनकारक नव्हते. विमान कोसळण्यापूर्वी एखाद्या स्कायडायव्हरने पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली होती का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाने परिसराची कसून तपासणी केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number